Good News; गो कोरोना....गो कोरोना...म्हणत पंढरपुरात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:03 PM2021-01-16T12:03:10+5:302021-01-16T12:03:48+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपूर आरोग्य विभागाकडे प्रथम टप्प्यात १६१० कोरोना डोस उपलब्ध झाले आहे. शनिवारपासून रोज १०० व्यक्तींना कोरोनाचे लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गो... कोरोना गो... असे म्हणत पंढरपुरात कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय येथील संसर्गजन्य रुग्णालय येथे कोविड १९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, प्रांत अधिकारी सचिन ढोले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, उप जिल्हा अधीक्षक अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, डॉ. प्रदीप केचे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. प्रसन्न भातलवंडे, डॉ. आबासाहेब गायकवाड, डॉ. दीपक धोत्रे, डॉ. आंनात पुरी, परिचारिका प्रमुख रेखा ओंबासे, रेवती नाडगोडा, मंगल करचे, सचिन कदम, सुधीर भातलवंडे, माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी, नगरसेवक विक्रम शिरसट, कल्पना बिडकर, रजिया नदाफ, नितीन घाडगे उपस्थित होते.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद गिराम यांना कोविडची लस देण्यात आली. लसीकरण केंद्रात गर्दी होऊ नये. यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरी लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण केंद्रासमोर नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी गो कोरोना....गो कोरोना अशा घोषणा दिल्या.