सोलापूर - प्रवाशांच्या सुविधांसाठी मध्य रेल्वेने ९ एप्रिल २०२१ पासून मुंबई-चेन्नई व पुणे-काझीपेठ या दोन विशेष एक्स्प्रेस रेल्वेगाड्या दररोज सोलापूर विभागातून धावणार आहेत. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पुणे-काझीपेठ विशेष सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस पुणे स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक शुक्रवारी रात्री १० वाजता सुटून काझीपेठ स्थानकावर रात्री ७.२० वाजता पोहोचेल. सदर गाडी ब्लॉक घेतल्यामुळे ९,१६ आणि २३ एप्रिलपर्यंत बल्हारशाह स्थानकापर्यंत धावणार आहे. या गाडीला २ ब्रेकयान, ४ जनरल, ११ स्लिपर, ४ एसी थ्री टियर, १ एसी टू टियर असे एकूण २२ कोच असणार आहेत. मुंबई-चेन्नई विशेष सुपरफास्ट दैनिक एक्स्प्रेस १० एप्रिलपासून धावणार आहे. ही गाडी मुंबई स्थानकावरून दररोज दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि चैन्नई स्थानकावर सकाळी १०.५० वाजता पोहोचणार आहे. या गाडीला २ ब्रेकयान, २ जनरल, ८ स्लिपर, ४ एसी थ्री टियर, १ एसी टू टियर, १ पोस्टल वॅन असे एकूण १८ कोच असणार आहेत. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.