सोलापूर - जन्म दाखले काढण्यासाठी महापालिकेत येण्याची आवश्यकता आहे. महापालिकेच्या वेबसाईटवर नोंद करुन ई-मेल किंवा घरच्या पत्त्यावर जन्म दाखले मिळतील असे पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी मंगळवारी सांगितले.
जन्म दाखले घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेत हेलपाटे घालावे लागतात. सोलापुरातील अनेक जण मुंबई, पुण्यासह विविध शहरात स्थायीक आहेत. अशा कुटूंबातील बालकांचा जन्म सोलापुरातील रुग्णालयांमध्ये होतो. जन्म दाखला मिळविण्यासाठी आईवडिलांनी यावे असा नियम आहे. पालिकेचे कर्मचारी दूर शहरात राहणाऱ्याा लोकांना हेलपाटे घालायला लावतात. हा प्रकार आता दूर होणार आहे. नागरिकांनी www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. येथील पेमेंट गेटवेवरुन पैसे भरावेत. दुरुस्ती किंवा नाव बदल, कायदेशीर प्रकरणांसाठी पालिकेत यावे लागेल, असेही पांडे यांनी नमूद केेले. आता जन्म दाखले देण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मृत्यू दाखले मिळतील, असेही त्यांनी सांगितले.