लोकप्रतिनिधींसह शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळणारा अर्धा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 09:28 AM2020-05-05T09:28:11+5:302020-05-05T09:29:24+5:30

'कोरोना'मुळे आर्थिक संकट; योजनांच्या खर्चावरही घातले निर्बंध...!!

Government, semi-government employees, including people's representatives, half the salary of officers | लोकप्रतिनिधींसह शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळणारा अर्धा पगार

लोकप्रतिनिधींसह शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळणारा अर्धा पगार

Next
ठळक मुद्देशासनाने याबाबत सोमवारी अध्यादेश जारी केला राज्यात कोरोना चे रुग्ण वाढतच आहेत

सोलापूर: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केंद्र शासनाने 20 मार्चपासून लाँकडाऊन जाहीर केल्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अर्धाच देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 

शासनाने याबाबत सोमवारी अध्यादेश जारी केला आहे राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत? साथीच्या नियंत्रणासाठी विविध निर्बंध घालण्यात आल्यामुळे शासनाच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोनााचा संसर्ग नियंत्रणात न आल्यामुळे लाँकडाऊनचा कालावधी वाढवला गेला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून आणखी दोन-तीन महिने यात सुधारणा होणार नाही अशी स्थिती आहे. याचबरोबर आरोग्य योजना सोडता इतर कोणत्याही योजनांवर निधी खर्च करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Government, semi-government employees, including people's representatives, half the salary of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.