मूलभूत दरांवरच वाढ

By admin | Published: June 25, 2014 01:29 AM2014-06-25T01:29:06+5:302014-06-25T01:29:06+5:30

वातानुकूलित रेल्वे प्रवासासाठी सेवा कर द्यावा लागणार

Growth at basic prices | मूलभूत दरांवरच वाढ

मूलभूत दरांवरच वाढ

Next



सोलापूर : २५ जूनपासून रेल्वे प्रवासी वाहतुकीत १४.२ टक्के वाढ झाली असली तरी जनरल, स्लीपरच्या मूलभूत दरांवरच (बेसिक फेअर) ही वाढ करण्यात आली आहे. मात्र वातानुकूलित प्रवास दराच्या तिकिटात मात्र सेवा कराची (सर्व्हिस टॅक्स) रक्कम द्यावी लागणार आहे.
सिद्धेश्वर एक्स्प्रेससाठी पूर्वी प्रथम श्रेणी वातानुकूलितसाठी १५९०, द्वितीय श्रेणीसाठी ९४५ तर तृतीय श्रेणीसाठी ६७५ रुपये तिकिटाचे दर होते. आता २५ जूनपासून अनुक्रमे १८००, १०६५ आणि ७६० रुपये इतक्या दरांनी प्रवास करावा लागणार आहे.
सोलापूर-पुणेसाठी इंटरसिटी, इंद्रायणीसाठी द्वितीय श्रेणीचे तिकीट दर ११५ वरून १२५ रुपये करण्यात आले असून, एसी चेअरकारच्या तिकीट दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी हे दर ३९५ होते. आता ४४५ रुपये तिकीट दर झाले आहे. अन्य गाड्याच्या स्लीपरसाठी १८५ (पूर्वीचे दर-१६०), द्वितीय श्रेणी वातानुकूलित प्रवासासाठी ६८८ (पूर्वी-६६५) आणि तृतीय श्रेणीसाठी ४८५ (पूर्वी-४७०) रुपये मोजून पुण्याचा प्रवास करावा लागणार आहे.
---------------------
इतके वाढले दर !
२६४ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-पुणे) प्रवास-स्लीपर-२१ रुपये, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-२५, तृतीयश्रेणी वातानुकूलित-१८ रुपये, चेअर कार-४४, स्लीपर-२१ रुपये.
३३५ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-हैदराबाद) प्रवास- स्लीपर-२५ रुपये, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-९५, तृतीयश्रेणी वातानुकूलित-६६ रुपये.
४५५ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-मुंबई) प्रवास- स्लीपर-३२ रुपये, प्रथमश्रेणी वातानुकूलित-२०५, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-१२०, तृतीयश्रेणी वातानुकूलित-८४ रुपये.
६५४ किलोमीटरपर्यंतचा (सोलापूर-यशवंतपूर) स्लीपर-४३ रुपये, द्वितीयश्रेणी वातानुकूलित-१६२, तृतीयश्रेणी वातानुकूलित-११३ रुपये.
---------------------------
सिद्धेश्वरचा नवा दर २९५
सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या स्लीपरसाठी पूर्वी २६५ रुपये दर होता. आता नव्या दरानुसार २९५ रुपये द्यावे लागणार आहे. पूर्वी प्रथम श्रेणी वातानुकूलितसाठी १५९०, द्वितीय श्रेणीसाठी ९४५ तर तृतीय श्रेणीसाठी ६७५ रुपये दर होते. आता ह१८००, १०६५ आणि ७६० रुपये असे दर आहेत.

Web Title: Growth at basic prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.