आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि त्यांच्या सहकाºयांनी स्वच्छता अभियानाचे काम कमी कालावधीत पूर्ण केले आहे. स्वच्छता अभियानाचा सोलापूर पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक आहे, असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले. स्वच्छ भारत मिशनमधील उत्कृष्ट कामांबद्दल बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मंत्रालयात डॉ. राजेंद्र भारूड आणि सहकाºयांचा गौरव केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ शंकर बंडगर, स्वच्छता तज्ज्ञ प्रशांत दबडे, समाजशास्त्र तज्ज्ञ महादेव शिंदे, तावशीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील, वैरागचे ग्रामसेवक बारसकर यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उपसचिव आऱ विमला, खासगी सचिव बाप्पा थोरात, संवाद सल्लागार कुमार खेडकर, लेखाधिकारी संदीप खुरपे आदी उपस्थित होते.---------------------शौचालय वापरासाठी.....च्मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, राज्यातील १५ जिल्ह्यांत स्वच्छता अभियानाचे काम चांगले आहे. शासनाकडून शौचालय बांधून देणे सोपे झाले आहे. मात्र त्याचा वापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. कीर्तनकार, धर्मगुरू , समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्फत या कामासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही लोणीकर यांनी केले.
स्वच्छतेचा सोलापूर पॅटर्न राज्यासाठी मार्गदर्शक : बबनराव लोणीकर, मुंबईत झाला सोलापूर जिल्हा परिषदेचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:16 PM
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि त्यांच्या सहकाºयांनी स्वच्छता अभियानाचे काम कमी कालावधीत पूर्ण केले आहे.
ठळक मुद्देराज्यातील १५ जिल्ह्यांत स्वच्छता अभियानाचे काम चांगले शासनाकडून शौचालय बांधून देणे सोपे झालेवापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे गरजेचेकीर्तनकार, धर्मगुरू , समाजातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्फत या कामासाठी प्रयत्न करा : लोणीकर