कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही आषाढी वारीसाठी सर्व संतांचे पालखी सोहळे पायी न जाता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर देहू ते पंढरपूर आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूतून प्रस्थान झाले. आज आषाढी वारीसाठी पालखी सोहळा देहूतून एस.टी. बसने निघून वारी मार्गावरून पंढरपूरकडे निघाला.
पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील निरा नदीवरील पूल ओलांडून पालखी सोहळ्याने सायंकारी ४ वाजून ५ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुढे पालखी सोहळा अकलूजकडे मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी भाविकभक्तांनी पुष्पवृष्टी करीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष केला. अकलूज शहरात गांधी चौक येथे अकलूजकरांनी ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ अशा जयजयकारात पुष्पवृष्टी केली. यानंतर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या बसचे दर्शन घेतले. पालखी सोहळा गांधी चौकातून जुने पोलीस ठाणे व जुन्या बसस्थानकासमोरील मार्गावरून माळीनगर, महाळुंग, बोरगाव, बोंडलेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
190721\1754-img-20210719-wa0032.jpg
अकलुज शहरात पुष्पवृष्ठी करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.