सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा, माढा, बार्शी आदी तालुक्यातील विविध भागात रविवारी सायंकाळी वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली़ माढा, बार्शी परिसरात तर गारांचा पाऊस झाला. शहरातही काही भागात पावसाने हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे.
करमाळा तालुक्यातील हिसरे, फिसरे व सालसे परिसरात आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस पडला. बार्शी तालुक्यातील पानगांव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून गाय ठार झाल्याची माहिती सांगण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथे वीज पडून बैल ठार झाला आहे.
दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील हवामानात बदल झाला होता. रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. चार वाजल्यापासून जिल्ह्याच्या काही भागात वादळी वारे जोरात वाहू लागले होते. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली़ काही ठिकाणी वादळी वाºयासह जोरदार पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.
यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची चांगलीच धावपळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासुन वातावरणात बदल झाल्याने सकाळपासून मोठ्या प्रमाणात उष्णता होती. दुपारच्या नंतर आणखी उकाडा वाढल्याने सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास येथे वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. वादळी पावसाचा प्रामुख्याने कांदा व गहू पिकाला फटका बसला आहे.