आरोग्यसेवक पोहोचले उसाच्या फडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:47+5:302021-02-05T06:48:47+5:30
सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू असल्यामुळे स्थलांतरित मजुरांची शेकडो बालके या मोहिमेपासून वंचित राहताना दिसतात. मात्र भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील ...
सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू असल्यामुळे स्थलांतरित मजुरांची शेकडो बालके या मोहिमेपासून वंचित राहताना दिसतात. मात्र भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील आरोग्यसेवक सुनील लोंढे यांनी अशा बालकांची शोधमोहीम राबवत चक्क ऊसतोडणी सुरू असलेल्या फडात जाऊन बालकांना पोलिओची लस दिली. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टर बांधावर पोहोचल्यामुळे ऊसतोडणी मजुरांच्या चिमुकल्यांना या मोहिमेचा लाभ घेता आला.
ऊसतोडणी, वीटभट्टी अशा इतर कामांसाठी स्थलांतरित कुटुंबातील बालकांच्या संदर्भात प्रत्येक लसीकरणावेळी विशेष लक्ष दिले जाते. याशिवाय पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणावेळी कर्मचाऱ्यांना अशा बालकांसाठी विशेष शोधमोहीम घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी सांगितले.
फोटो ::::::::::::::::
भांबुर्डी येथील आरोग्यसेवक सुनील लोंढे उसाच्या बांधावर जाऊन बालकांना लसीकरण करताना.