कचरागाडीत पवित्र निर्माल्य गोळा करून हिंदू परंपरा, देवतांचा अपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:26 AM2021-09-22T04:26:09+5:302021-09-22T04:26:09+5:30
पंढरपूर नगरपालिकेने श्री गणेशाला अर्पण केलेले निर्माल्य कचरागाडीत एकत्र करण्याचे नियोजन केले होते. ही घटना अत्यंत संतापजनक आणि धार्मिक ...
पंढरपूर नगरपालिकेने श्री गणेशाला अर्पण केलेले निर्माल्य कचरागाडीत एकत्र करण्याचे नियोजन केले होते. ही घटना अत्यंत संतापजनक आणि धार्मिक भावनाना तीव्र वेदना देणारी आहे. कचरागाडी ही कचऱ्यासाठी असते, ती कचरा म्हणून वापरली जाते. त्यात नासके, कुजके पदार्थ जे टाकाऊ असतात त्याच्या वाहतुकीसाठी हे वाहन आहे. एम एच १३ सी यू ८६९१ या क्रमांकाच्या वाहनाचा कचरा गोळा करण्याची गाडी म्हणून वापर होतो.
घरांमधील केरभरणी कितीही स्वच्छ केली तरी ते आपण त्यात अन्न घेऊन खात नाही. कारण केरभरणी ही केरासाठीच वापरली जाते. पवित्र निर्माल्य हेतुपुरस्सर कचरागाडीत गोळा करून समाजाला विकृत मानसिकता नगरपरिषदेने दाखविली आहे.
देवतांचे निर्माल्यही देवताप्रमाणे पवित्र असते. म्हणूनच श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमाता यांना अर्पण केलेला हार आणि फुले ही प्रसाद म्हणून भाविकाला देतात. त्यात त्याला कृतार्थता/कृतज्ञता वाटते. त्यातून देवतांना अर्पण केलेले हार, दुर्वा ही देवतेसमान पवित्र असतात अशी भावना हिंदू धर्मात आहे. त्याचमुळे श्री विठ्ठलाचा हार प्रसाद म्हणून दिला जातो. निर्माल्य कधीही कचरा होत नाही. कचरागाडीत पवित्र निर्माल्य गोळा करून हिंदू धर्म, परंपरा, आणि देवतांचा घोर अपमान केला आहे.
...................
निर्माल्य कचरागाडीत ठेवणे म्हणजे विडंबन
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर श्रध्देने फुले दुर्वा, प्रसाद अर्पण केला जातो. त्यास शास्त्रीय आधार आहेत, असे निर्माल्य जे अर्पण/वाहिल्याने त्यात श्रीगणेशाच्या तत्त्वाने पवित्र झालेले असते. असे निर्माल्य गोळा करण्यास कचरागाडी ठेवणे म्हणजे त्याचे विडंबन होते आहे. त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल संकलन करणारा वाहन चालक ते गोळा करण्यास सहाय्य करणारे पंढरपूर नगर परिषदचे कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असा अर्ज पाटील यांनी केला आहे.