हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव प्रकल्प पावसाळ्यात कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:30 PM2019-08-02T15:30:00+5:302019-08-02T15:32:23+5:30

बार्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली

Hingani, Neargaon, Pimpalgaon project drying up in the rainy season | हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव प्रकल्प पावसाळ्यात कोरडेठाक

हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव प्रकल्प पावसाळ्यात कोरडेठाक

googlenewsNext
ठळक मुद्देवैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली

धनाजी शिंदे 
वैराग : बार्शी तालुक्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पडणारा पाऊस यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई अर्थात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात याही वर्षी तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हिंगणी, ढाळेपिंपळगाव व जवळगाव यांसारखे प्रकल्प आणि भोगावती, नागझरी, नीलकंठा या नद्या पावसाअभावी कोरड्याठाक पडल्या आहेत तर धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली आहे. धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली़ तशीच वेळ आज हिंगणी, पिंपरी, पिंपळगाव, मळेगाव येथील द्राक्षे पिकवणाºया शेतकºयांवर आली आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा पाण्याअभावी नेस्तनाबूत होणार हे पाहून शेतकरीराजा चिंतातुर व भावुक झाला आहे. वर्षभराचे नियोजन ज्या पिकावर शेतकरी करतो त्या खरिपाची पेरणी परिस्थिती नसतानाही केली आहे.

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती आज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पावसाने दिलेली हुलकावणी व याही वर्षी दिलेली ओढ यामुळे मुलांच्या शिक्षणाचा आणि जीवन जगण्याचा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील वातावरण नसल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

Web Title: Hingani, Neargaon, Pimpalgaon project drying up in the rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.