गुन्ह्याचा शोध घेणाºया पोलिसांकडे आता ‘होम क्वारंटाईन’चा तपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:58 PM2020-05-23T12:58:38+5:302020-05-23T13:00:35+5:30

बाहेरुन आलेल्यांपासूनच पंढरपूरला धोका; सोलापूर ग्रामीणमधील चार्ली, निर्भया पथकाचा वॉच

Home quarantine investigation now underway in Solapur Grameen | गुन्ह्याचा शोध घेणाºया पोलिसांकडे आता ‘होम क्वारंटाईन’चा तपास !

गुन्ह्याचा शोध घेणाºया पोलिसांकडे आता ‘होम क्वारंटाईन’चा तपास !

Next
ठळक मुद्देबाहेरून येणाºया नागरिकांकडून शहरातील नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक महामार्गावर नाकाबंदीबाहेरुन आलेल्या लोकांची यादी नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध

सचिन कांबळे
पंढरपूर : पंढरपुरातील एकाही नागरिकाला आजपर्यंत कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झाली नाही, परंतु बाहेरुन येणाºया लोकांपासून पंढरपुरातील नागरिकांना कोरोनाचा धोका आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुन्ह्याचा तपास करुन न्याय मिळवून देणाºया पोलिसांचे कामच बदलले आहे. गुन्हेगारी वाढू नये, यासाठी कार्यरत असलेले पोलीसच आता शहराचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी होमक्वारंटाईन लोकांचा तपास करण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

बाहेरून येणाºया नागरिकांकडून शहरातील नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक महामार्गावर नाकाबंदी केली आहे. यामध्ये कराड रोडवरील फूट रस्ता, पुणे-सातारा रस्त्यावरील वाखरी चौक, टेंभुर्णी रस्त्यावर अहिल्यादेवी चौक, कोल्हापूरहून येणाºया रस्त्यावरील चौथा मैल चौक, गोपाळपूर चौक या पाच ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

पंढरपूर शहरात बाहेरगावाहून येणाºया नागरिकांना वाटेतच अडविण्यात येत आहे. त्या नागरिकांकडे असणाºया पासची पाहणी करून माहिती उपजिल्हा रुग्णालयास कळवण्यात येते. त्यांना रुग्णालयात नेऊन होमक्वारंटाईन करण्यापर्यंत पाठपुरावा पोलीस करत आहेत. बाहेरुन आलेल्या लोकांची यादी नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध आहे. उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषद प्रशासनाकडून रोज होमक्वारंटाईन लोकांच्या आरोग्याबाबतची चौकशी करण्यात येत आहे.

निर्भया पथकाकडून कोरोनाबाबत होतेय जनजागृती
- पंढरपूर शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पथकप्रमुख सपोनि दशरथ वाघमोडे, पोउपनि राजेंद्र गाडेकर, पो.कॉ. कुसुम क्षीरसागर, पो.कॉ. विनोद शिंदे, पो.कॉ. अविनाश रोडगे, पो.कॉ. संतोष चवरे हे काम करतात. त्यांना सहकारी म्हणून समाजसेविका डॉ. संगीता पाटील, चारुशिला कुलकर्णी यादेखील काम करतात. सध्या या पथकाच्या कामात बदल झाला आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासह शहरात विनाकारण फिरणाºयांवर कारवाई करत आहेत. व्यापाºयांकडून जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोच कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीत दुकाने बंद-चालू होतात की नाही याची तपासणी करत आहेत. दुकानासमोर फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवणे, मास्क न वापरणाºया नागरिकांवर व व्यापाºयावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दशरथ वाघमारे यांनी दिली.

चार्ली विभागाचे बदलले काम
- पंढरपूर शहरात होणाºया अवैध धंद्यावर तत्काळ बंदी यावी. शहरात अनपेक्षित उद्भवणाºया प्रसंगावेळी तत्काळ चार्लीचे कर्मचारी येऊन परिस्थिती नियंत्रित आणण्याचे काम करतात. गर्दीच्या ठिकाणी पाकीट मारी, छेडछाड असे प्रकार रोखण्यासाठी चार्लीची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये पोहेकॉ सूरज हेंबाडे, पो.कॉ. प्रवीण मेटकरी, पो.कॉ. धनंजय जाधव, पो.कॉ. नीलेश कांबळे, पो.कॉ. शबीर अत्तार, पो.कॉ. अनिल एडगे, पो.ना. ताजुद्दीन मुजावर, पो.ना. विशाल हेडगीकर या आठ कर्मचाºयांचा सहभाग होता. दोन कर्मचाºयांचे चार पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडे शासनाच्या मोटरसायकली देखील दिल्या आहेत; मात्र कोरोनामुळे त्यांच्या कामाची पद्धत बदलली आहे. आता बाहेरुन आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. रोज होमक्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या घरी दोनवेळा जात आहेत. त्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यापासून रोखण्याचे काम चार्लीचे कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पो.नि. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याची माहिती हजेरी मेजर रणजित पाटील यांनी दिली.

महाराष्टÑ शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यापासून इतर जिल्ह्यातील नागरिक आपापल्या गावी परतत आहेत. त्याप्रमाणे रेड झोन असलेल्या मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली यासारख्या अन्य जिल्ह्यातून ११५० नागरिक पंढरपुरात आले आहेत. शहरात येणाºया नागरिकांचा कालावधी १० मे ते २० मे असा आहे. या सर्व नागरिकांचा होमक्वारंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत शहरातील नागरिकांना धोका आहे. यामुळे या होमक्वारंटाईन लोकांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या लोकांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यापासून व इतर लोकांमध्ये मिसळण्यापासून रोखण्याचे काम सुरु आहे.
- डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर 

Web Title: Home quarantine investigation now underway in Solapur Grameen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.