Good News; सोलापूर-पुणे महामार्गावर एका तासाला एक शिवशाही गाडी धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:06 PM2019-11-26T13:06:18+5:302019-11-26T13:09:32+5:30

सोलापूर आगारात नवीन अकरा बस दाखल; प्रवाशांना होणार फायदा

An hourly Shivshahi train will run on Solapur-Pune highway | Good News; सोलापूर-पुणे महामार्गावर एका तासाला एक शिवशाही गाडी धावणार

Good News; सोलापूर-पुणे महामार्गावर एका तासाला एक शिवशाही गाडी धावणार

Next
ठळक मुद्देगेल्या चार ते पाच महिन्यांपासून सोलापूर आगारातील पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया विस्कळीत झाल्या होत्याकाही दिवसांपूर्वी सोलापूर आगारात नवीन अकरा शिवशाही गाड्यांचा समावेश झाला आहेपुण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ पर्यंत प्रत्येक एका तासासाठी एक शिवशाही गाडी पुण्यासाठी धावणार आहे

सोलापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया आता पूर्वपदावर येत आहेत़  सोलापूर आगारात ११ नवीन शिवशाही गाड्यांचा समावेश झाला आहे़ यामुळे सोलापूर आगारातून पुण्यासाठी प्रत्येक तासाला एक गाडी सुरू होणार आहे़ यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सोलापूर आगारातील पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया विस्कळीत झाल्या होत्या यामुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागत होता़ पण काही दिवसांपूर्वी सोलापूर आगारात नवीन अकरा शिवशाही गाड्यांचा समावेश झाला आहे़ यामुळे आता पुण्यासाठी पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ पर्यंत प्रत्येक एका तासासाठी एक शिवशाही गाडी पुण्यासाठी धावणार आहे़ तर पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी पहाटे ५.३० ते रात्री १२. ३० पर्यंत प्रत्येक तासाला एक गाडी असणार आहे.

एसटीच्या स्वमालकीच्या नवीन शिवशाही गाड्या दाखल झाल्यामुळे सोलापूर आगारातील शिवशाही गाड्यांचा आकडा १९ वर पोहोचला आहे़ सोलापूर आगारात आतापर्यंत पुणे महामार्गावर ८ गाड्यांच्या माध्यमातून दिवसातून १८ फेºया केल्या जात होत्या; 
पण आता गाड्यांची संख्या वाढल्यामुळे आता दिवसाकाठी २१ फेºयांचे नियोजन करण्यात आले आहे़ सोलापूर आगारात सामील झालेल्या सर्व गाड्या या एसटीच्या स्वमालकीच्या आहेत़ चार-पाच महिन्यांपूर्वी सोलापूर आगारातील खासगी जवळपास १५ शिवशाही गाड्या या अचानक बाहेर पाठवण्यात आल्या होत्या़ यामुळे पुणे महामार्गावरील शिवशाही गाड्यांच्या फेºया विस्कळीत झाल्या होत्या.

मोबाईल अ‍ॅपवर सुविधा
- सोलापूर आगारातील शिवशाहीची संख्या कमी झाल्यामुळे आॅनलाईनवर शिवशाही गाड्यांचे आरक्षण करण्यात येत नव्हते़ पण आता सर्व फेºया पूर्वपदावर येत असल्यामुळे आता पुन्हा सर्व गाड्या आॅनलाईनवर आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहेत़ याचबरोबर मोबाईल अ‍ॅपवरही आरक्षण सुविधा थोड्याच दिवसात सुरू करण्यात येणार आहे़ 

सोलापूर आगारातून पुण्यासाठी जाणाºया प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाला शिवशाही गाड्यांची मागणी करण्यात आली होती़ यानुसार आता सोलापूर आगारात ११ नवीन शिवशाही गाड्या नुकत्याच दाखल झाल्या आहेत यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावर प्रत्येक तासाला एक गाडी सोडण्यात येत आहे़ 
-दत्तात्रय कुलकर्णी,
आगार व्यवस्थापक, सोलापूर 

Web Title: An hourly Shivshahi train will run on Solapur-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.