माणुसकी; बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी केली चारा अन् पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:09 PM2020-05-05T16:09:21+5:302020-05-05T16:10:23+5:30

वन्यप्राण्यांसाठी मंदिर समिती आली धावून; पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय....!

Humanity; Feed and water supply for wildlife at Bardi | माणुसकी; बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी केली चारा अन् पाण्याची सोय

माणुसकी; बार्डी येथील वन्यप्राण्यांसाठी केली चारा अन् पाण्याची सोय

Next
ठळक मुद्दे१७ मार्च पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णयमजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्या वतीने दररोज ३००० फूड पॅकेट

पंढरपूर :  बार्डी (ता. पंढरपूर) येथील वन क्षेत्रामध्ये ३०० पेक्षा जास्त गाई व २०० पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीवांची चारा व पाण्याची सोय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. कोरोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून गाईचा चाºयाचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब लक्षात घेवून मंदिर समितीने चारा पुरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. 


बार्डी येथील वन्यप्राण्यांना चारा आणि पाण्याची टंचाई भासत असल्याची बाब मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी मंदिर समितीकडे या जनावरांच्या चाºयाची व पाण्याची व्यवस्था करावी अशी आग्रहाची मागणी केली होती. त्यानंतर सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सदर ठिकाणी सक्षम भेट दिली व वस्तुस्थिती ची पाहणी केली. त्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य यांच्याशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला.  यातील पहिला टप्पा म्हणून दि ४  मे २०२० रोजी २५०० पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळील सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज १५० ते २०० पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास सुरुवात केली आहे. तसेच दर दोन दिवसांनी २५००० लिटर पाणी टँकर द्वारे पाठऊन तेथील पाणी टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल.
 
मजूर निराधारांना ३ हजार फूड पॅकेटचे वाटप

१७ मार्च पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून पंढरपूर शहर व परिसरात अडकून राहिलेल्या

मजूर व निराधार नागरिकांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीच्या वतीने दररोज ३००० फूड पॅकेट देण्यात येत आहेत अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

Web Title: Humanity; Feed and water supply for wildlife at Bardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.