मूळचे करमाळ्याचे रहिवासी असलेले होमगार्ड जवान एस. एम. ढेपे हे मागील काही महिन्यांपासून पंढरपूर येथे बंदोबस्ताची ड्यूटी बजावत असताना ३ मे रोजी ढेपे कोरोना पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांचे सिटीस्कॅन केले असता १८ असल्याचे निदर्शनास आले. शरीरातील ऑक्सिजन देखील कमी झाले होते. याबाबतची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना समजताच त्यांनी ढेपे यांच्यासाठी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर असलेला बेड उपलब्ध करून दिला.
त्याचबरोबर कोणतीही अडचण असल्यास तत्काळ फोन कर, घाबरू नकोस... मी आहे असे म्हणत झेंडे यांनी आधार दिला. यामुळे ढेपे यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. सध्या ढेपे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. झेंडे स्वतः फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते. होमगार्ड जवानावर असे संकट ओढावल्याचे गांभीर्य घेत स्वतः अतुल झेंडे तातडीने सर्वस्वी मदत उपलब्ध करून दिल्याने ढेपे यांनी त्यांचे आभार मानले आहे.
---
पोलीस कल्याण निधीतून औषध पुरवठा
होमगार्ड ढेपे यांना ६ रेमडेसिविर इंजेक्शन व अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. हा औषध पुरवठा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस कल्याण निधीतून केला आहे. यामुळे होमगार्ड ढेपे यांचे प्राण वाचण्यास मदत झाली.
--