ग्यानबा दीपक धोत्रे (रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर) याच्यावर तीन वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्याने त्याला पंढरपूर, मोहोळ मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. सिकंदर चंद्रकांत कोळेकर (रा. नेतपगाव, ता. पंढरपूर) याच्यावर वाळू चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याला पंढरपूर व मंगळेवढा तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तानाजी कैलास खंडागळे (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) याच्यावर दारू विक्रीचे तीन गुन्हे दाखल असल्याने त्याला एक वर्षाकरिता पंढरपूर, मंगळेवढा व सांगोला तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे. समाधान सुखदेव ढवळे (रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) याच्यावर अवैध वाळू विक्रीचे चार गुन्हे दाखल असून, त्यास पंढरपूर मंगळवेढा व माळाशिरस तालुक्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे.
आकाश रामदास शिंदे (रा. भंडीशेगाव, ता. पंढरपूर) याच्यावर दारू विक्रीचे व जबरी चोरीचे एकूण पाच गुन्हे दाखल असून, त्याला पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.