पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल अंमलात आणावे; पर्यावरण तज्ज्ञांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:11 PM2020-06-05T12:11:45+5:302020-06-05T12:15:13+5:30

सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या जास्त वापरावर यावे नियंत्रण 

Implement a model of environmental conservation; Expectations from environmental experts | पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल अंमलात आणावे; पर्यावरण तज्ज्ञांची अपेक्षा

पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल अंमलात आणावे; पर्यावरण तज्ज्ञांची अपेक्षा

Next
ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात पडणाºया पावसामध्ये फार मोठा बदल झाला नाहीगरज पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणायला हवेभूजल पातळी खाली गेली तर त्याचा नदी व वनावरही परिणाम होतो

 शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : जगाच्या एखाद्या विशिष्ट भागात अमूक एक मॉडेल राबविले म्हणजे आपल्याकडेही तेच मॉडेल उपयोगी पडेल असे नाही. त्या मॉडेलचा शास्त्रीय अभ्यास करुन त्या भागातील परिस्थितीबाबत संशोधन करुन पर्यावरण संवर्धनाचे नवे मॉडेल तयार करायला हवे.

सोलापूर जिल्ह्यात पडणाºया पावसामध्ये फार मोठा बदल झाला नाही. पण, लोकसंख्या वाढत आहे. या सर्वांची गरज पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणायला हवे. भूजल पातळी खाली गेली तर त्याचा नदी व वनावरही परिणाम होतो. सध्या भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत; पण या प्रयत्नापेक्षा जमिनीतून पाण्याचा उपसा जास्त होत आहे. 

मागील २० वर्षांत पर्यावरणामध्ये बदलही झाला. करमाळा, माढा हा भाग पाण्याने समृद्ध झाला; मात्र, बार्शी, अक्कलकोट हा भाग अद्यापही पावसावरच अवलंबून आहे. तसेच वाळूचा उपसा वाढल्याने जमिनीची पाणी साचवून ठेवण्याची क्षमता  कमी होत आहे. वसुंधरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बापू राऊत यांनी सोलापूर शहरातील पर्यावरणीय समस्यांचा भौगोलिक अभ्यास या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसर जगभरात पर्यावरणात बदल होत आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्याच्या पर्यावरणातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कमी पाऊस पडतो.  वाढत्या लोकसंख्येमुळे जलसिंचनाची साधने कमी पडू लागली. वाळूचा उपसा वाढला. मागील २० वर्षांमध्ये सरासरी तापमानात २ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया, इस्त्रायल या देशात कमी पाऊस पडतो. प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त किती वापर करुन घ्यायचे याचे तंत्रज्ञान तिथे प्रगत झाले आहे. आपल्याकडील भागाचा विचार करुन काही तंत्रज्ञान आपल्याकडेही राबवता येईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली.

सन 2000 ची स्थिती

  • 1. सोलापूर जिल्ह्याचे सरासरी तापमान हे ३५ अंश सेल्सिअस इतके होते. २००० मधील परिस्थितीनुसार हे तापमान कमी आहे. 
  • 2.  लोकसंख्येचा परिणामही पर्यावरणावर होतो.  सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही ३८ लाख ४९ हजार ५४३ इतकी होती.         
  • 3. भारतीय हवामान विभागाच्या सोलापूर शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यात सरासरी ५४० मिलीमीटर इतका पाऊस पडत होता.          
  • 4. १९८० मध्ये बांधल्या गेलेल्या उजनी धरणामुळे करमाळा, पंढरपूर, बार्शी, माढा, मंगळवेढा येथे हिरवळ वाढीस लागत होती.                     
  • 5. एकूणच जिल्ह्याचा विचार केला असता, सरासरी ६० फुटावर बोअर आणि विहिरीला पाणी लागत होते. 

सध्याची स्थिती

  • 1. सध्याची परिस्थिती पाहता सरासरी तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून आता ते ३७ अंश सेल्सिअस इतके आहे.
  • 2. भारतीय राष्ट्रीय जनगणना अहवालानुसार जिल्ह्याची लोकसंख्या ४६ लाख १७ हजार ७५६ इतकी आहे. सुमारे आठ लाखांची वाढ.               
  • 3. जिल्ह्यात सरासरी ३७७ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. २० वर्षांत १६३ मिलीमीटरची घट दिसून येते.            
  • 4. करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, परिसरात ५ टक्क्यांनी वनाची वाढ होताना दिसत आहे. तर जवळच्या इतर भागांनाही फायदा होतोय.    
  • 5. आजची परिस्थिती पाहता पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. सध्या सरासरी ४०० फुटांवर पाणी लागते.

पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी...

  • 1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीत कमी करून जगावे.
  • 2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
  • 3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
  • काय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
  • 4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
  • 5. पाणी किती अंतरावरून येते ते पाहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाºयांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
  • 6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
  • 7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकारने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
  • 8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तत्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
  • 9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
  • 10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.

Web Title: Implement a model of environmental conservation; Expectations from environmental experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.