कुर्डूवाडीतील गॅस शवदाहिनीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:02+5:302021-07-10T04:16:02+5:30
कुर्डूवाडी : येथील नगरपालिकेला जिल्हा वार्षिक योजनेच्या यंत्रसामग्री व नावीन्यपूर्ण योजनेतून हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामासाठी १ ...
कुर्डूवाडी : येथील नगरपालिकेला जिल्हा वार्षिक योजनेच्या यंत्रसामग्री व नावीन्यपूर्ण योजनेतून हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामासाठी १ कोटी ७ लाख रुपये मंजूर झाले असून, प्रत्यक्ष कामासही सुरुवात करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर मुलाणी व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे यांनी दिली.
कुर्डूवाडी येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी व दहनशेड बांधकामाचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून खास बाब म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, खासदार राहुल शेवाळे, आ. संजयमामा शिंदे यांनी निधीसाठी प्रयत्न केले. या कामासाठी प्रशासकीय, तांत्रिक निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
याप्रसंगी स्वाभिमानी पक्षाचे नेते संजय गोरे, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक बबन बागल, आनंद टोणपे, निवृत्ती गोरे, कनिष्ठ अभियंता वैशाली मठपती, आरपीआयचे चंद्रकांत वाघमारे, समद मुलाणी, मनोज धायगुडे, बबलू वाल्मीकी, स्वप्नील गवळी, विशाल गोरे, बाळू जगधने, अस्लम शेख, ज्योतिबा लोखंडे आदी उपस्थित होते.
............
फोटो : ०९ कुर्डूवाडी
कुर्डूवाडीतील हिंदू स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय डिकोळे, संजय गोरे, बबन बागल, चंद्रकांत वाघमारे, आनंद टोणपे.