उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ, धरण प्लसमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:48 PM2018-07-18T12:48:05+5:302018-07-18T12:50:54+5:30
जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात ६६ हजार ४५८ क्युसेक्सचा विसर्ग.
सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात ६६ हजार ४५८ क्युसेक्सचा विसर्ग वरच्या धरणातून येत यामुळे धरण प्लसमध्ये आले आहे.
मंगळवारी सकाळी ६ वाजता दौंडमधून येणारा विसर्ग २७ हजार ५२४ क्युसेक्सवरून दुपारी १२ वाजता वाढ होऊन बंडगार्डन व दौंड येथून येणारा विसर्ग ६३ हजार ४४७ क्युसेक्स तर दुपारी ४ वाजता बंडगार्डन येथून येणारा विसर्ग ४८ हजार ७०० क्युसेक्स तर दौंड येथून येणारा विसर्ग ६६ हजार ८०० क्युसेक्स होता.
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर गेल्या ४८ तासांत १ हजार मि. मी. पावसाची नोंद झाली असून, पुणे परिसरातील १९ धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पिंपळजोगे, माणिकडोह ,वडज, डिंबे, घोड, विसापूर, कळमोडी १०० टक्के, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई ९० टक्के, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला १०० टक्के यापैकी चार धरणे जवळपास भरली असून, त्यातील विसर्ग खाली सोडला जातोय. इंद्रयणी नदीचेदेखील पाणी येत असून, अजूनही विसर्ग वाढण्याची शक्यता धरण प्रशासनाने वर्तवली आहे. भीमे वारीला २ हजार क्युसेक्स केला आहे.
उजनीची सद्यस्थिती
- - एकूण पाणीपातळी ४९१.१०० द. ल. घ. मी.
- - एकूण पाणीसाठा १८१६.६८ द. ल. घ. मी.
- - उपयुक्त पाणीसाठा १३.८७
- - टक्केवारी ०.९१ टक्के
- - बंडगार्डन विसर्ग ४८ हजार ७८३ क्युसेक्स
- - दौंड विसर्ग ६६ हजार ४५८ क्युसेक्स
- - भीमा नदीला सोडलेले पाणी २ हजार क्युसेक्स