पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम आंदोलन; पगार मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 09:47 AM2021-01-05T09:47:55+5:302021-01-05T09:48:35+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Indefinite work agitation of Pandharpur Municipal Corporation employees; Employees are aggressive because they are not getting paid | पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम आंदोलन; पगार मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक

पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम आंदोलन; पगार मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक

googlenewsNext

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार न झाल्याने व शासनाकडून वेतन अनुदान न मिळाल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार न झाल्याने २९ डिसेंबर रोजी नगर परिषदेसमोर कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, राज्याचे सरचिटणीस सुनील वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारेसह कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे या हेतूने शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे आवश्यक आहे, परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने  नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या मार्च महिन्यापासून काम करीत आहेत परंतु शासनाकडून गेल्या दोन वर्षापासून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेनंतर दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होतो परंतु  शासनाकडून अद्याप पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम पंढरपूर नगरपरिषदेला दिली गेली नाही, त्यामुळे पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहिला आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सहाय्यक वेतन अनुदान मिळावे म्हणून शासनाचे  या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान,  काम बंद आंदोलनचे निवेदन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्ष साधना भोसले यांना संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, सरचिटणीस सुनील वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागन्नाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, अनिल गोयल यांच्या शिष्टमंडळाने दिले.

Web Title: Indefinite work agitation of Pandharpur Municipal Corporation employees; Employees are aggressive because they are not getting paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.