सोलापूर : गैरसमज, निष्काळजीपणातून रुबेलाबाबत चर्चा होते आहे़ भावी पिढी सुदृढ व्हावी म्हणून पोलिओ, स्मॉल फ ॉक्स, धनुर्वात या मोहिमांच्या धर्तीवर मिझेल्स रुबेला लस दिली जात आहे. या लसीचे वाईट परिणाम नाहीत, पोटभर खाऊ घालून पाल्यांना ही लस द्या, असा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी लोकमतशी बोलताना दिला आहे.
प्रश्न : रूबेला लसची मोहिम किती वर्षाची आहे ?१९९५ पासून पोेलिओ लस सुरू करण्यात आली. पोलिओमुक्ती झाली़ पोलिओमुक्तीसाठी २३ वर्षे शासनाने मोफत लस पुरवली़ त्यापूर्वी १९८५ पासून जन्मलेल्या बाळाला नवव्या महिन्यात मिझेल्स लस दिली जात आहे. आता सुदृढ पिढीसाठी केवळ दोन वर्षात ही मोहीम राबविली जात आहे.
प्रश्न : रूबेला लसीकरण मोहिम कशी यशस्वी ठरेल ?समाजात कम्युनिटी-इम्युनिटीच्या जोरावर पोलिओची मोहीम यशस्वी ठरली़ आता यापुढे याच कम्युनिटी-इम्युनिटीच्या जोरावर मिझेल्स रुबेला मोहीम राबविली जात आहे़ ही राष्ट्रीय मोहीम आहे.
प्रश्न : मिझेल्स रुबेला लसीकरणाबाबत काय सांगाल ?यापूर्वी मूल जन्मल्यानंतर नवव्या महिन्यात केवळ ‘मिझेल्स’ लस दिली जात होती़ त्यानंतर खासगीमध्ये पालक रुबेला लस देत होते़ आता शासनाने दोन्ही लस एकत्रित करून ती सरकारमार्फत पुरवत आहे़ दोन वेळा दिल्या जायच्या लसी आता दोन्ही एकत्रित केलेली लस दिली जात आहे़ पाल्य आणि पालकांच्या दृष्टीने ‘पॉवरफुल लस’ ठरणारी आहे़ यापुढे नवव्या महिन्यात कुठेही मिझेल्स रुबेला हीच लस दिली जाणार आहे़ २०२० पर्यंत ही मोहीम पोलिओच्या धर्तीवर प्रभावीपणे राबवली जाणार आहे़
प्रश्न : लसीकरण दरम्यान पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी ?उत्तर : ज्या दिवशी लस द्यायची आहे त्या दिवशी पाल्याला पोटभर खाऊ घाला, मगच लस द्या़ उपाशीपोटी लस अजिबात देऊ नका़- ताप वा अन्य कुठला मोठा आजार असेल तर ही लस देऊ नका़ तसे लस देणाºया वैद्यकीय तज्ज्ञांना सांगा.- ही लस सक्तीची नाही़ भावी पिढीच्या सुदृढतेसाठी असून ती दिली जात असून, पालकांनी उपस्थित राहूनच ती लस पाल्यांना घ्यावी़- लस दिल्यानंतर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली अर्धा तास राहा़ मगच पाल्याला घरी घेऊन जा.
-प्रश्न : लसीकरणानंतर काही वेगळा परिणाम जाणवल्यास पालकांनी काय करावे ? उत्तर : लसीनंतर काही वेगळा परिणाम जाणवल्यास तेथील डॉक्टरांशी संपर्क साधून दिलेल्या एआयएम कीट वापरा़ या कीटमध्ये सलाईन, ओआरएस पाकीटसह आवश्यक औषधे, साधने आहेत़ प्रत्येक शाळेला प्रशिक्षित डॉक्टर दिला असून, त्यांची मदत घ्या.