जनसंवाद यात्रेच्या निमंत्रण पत्रिकेवरून राष्ट्रवादीत कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:47+5:302021-02-16T04:23:47+5:30
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आपल्याकडेच कायम राहावी, त्यादृष्टीने राष्ट्रवादीने सावध पावले टाकणे सुरू केले आहे. संभाव्य उमेदवार आपणच असे ...
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आपल्याकडेच कायम राहावी, त्यादृष्टीने राष्ट्रवादीने सावध पावले टाकणे सुरू केले आहे. संभाव्य उमेदवार आपणच असे गृहीत धरून भगीरथ भालके यांनी मतदारसंघात भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त संवाद यात्रा सुरू केली. मात्र, भारत भालकेंच्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभे असलेल्या पंढरपूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. शिवाय, कार्यक्रमपत्रिकेतूनही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या नाराजांना सामावून घेताना राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या अडचणींच्या काळात जे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सत्ता आणण्यासाठी मोठी लढाई केली, त्याच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता भाजपच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत कसे आले, तो नेता राष्ट्रवादीत आला की, भाजपच महाविकास आघाडीमध्ये सामील झाला, याबाबत भगीरथ भालके यांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही दीपक पवार यांनी केली आहे.
कोट :::::::::::::::
दीपक पवार यांनी काय पत्रक काढलं आहे, हे अद्याप बघितलेले नाही. मंगळवेढा येथून सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेचे नियोजन मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांनी केले होते. या यात्रेचा शेवट पंढरपूरमध्ये होणार आहे. त्यावेळी या तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्यात येईल. त्यांच्यासारख्या अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी कित्येक वर्षांपासून पक्षात काम केले आहे. त्यामुळे त्यांना डावलण्याचा प्रश्नच नाही. त्यांचा गैरसमज असेल तर त्यांच्याशी आपण स्वत: बोलून गैरसमज दूर करू.
- भगीरथ भालके,
चेअरमन, विठ्ठल कारखाना