मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ करमाळा, माढा कडकडीत बंद
By Appasaheb.patil | Published: February 14, 2024 12:22 PM2024-02-14T12:22:41+5:302024-02-14T12:23:01+5:30
जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. १० तारखेला सुरु झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढ्यात आज कडकडीत बंद पुकारण्यात आला असून याला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृती ढासळताना पाहून उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनीही त्यांना निदान पाणी तरी प्या अशी गळ घातली आहे. जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, जरांगे त्यांनाही नकार दिला. करमाळा अन् माढ्यात समस्त व्यापारी, छोटे व्यावसायिक यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. दुकाने, मॉल, हातगाडे बंद ठेवून महाराष्ट्र बंदच्या या आंदोलनास पाठिंबा देऊ, असे आवाहन व्यापारी व छोटे व्यावसायिकांनी केले आहे. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा व माढा पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.