विजयपूर : कर्नाटकमधील २०१८ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्यात सुरू असलेल्या नाटमय घडामोडींनतर सोमवारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे़ विजयपूर जिल्ह्यातील बसवण बागेवाडी तालुक्यातील मनगुळी गावानजीक असलेल्या मजुराच्या घरात ८ व्हीव्हीपॅट मशीन आढळल्याने कर्नाटक राज्यात संपूर्ण विजयपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. २०१८ विधानसभा निवडणूक यंत्रणाही या प्रकारामुळे खडबडून जागी झाली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर इव्हीएम मशिनवर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती. याच घडामोडीत आता व्हीव्हीपॅटबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. विजयपूर जिल्ह्यातील मनगोळी गावातील मजुराच्या घरात ८ व्हीव्हीपॅटचे कव्हर्स आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या कव्हर्सचा वापर हे मजूर कपडे ठेवण्यासाठी करत होते. याबाबत पुढील तपास सुरू आहे. मजुराच्या घरी सापडलेल्या मशीन नसून व्हीव्हीपॅटचे ते कव्हर असल्याचं पोलिसांनी म्हटलं. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या व्हीव्हीपॅटला बॅटरी नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
जिल्हाधिकारी एस़ बी़ शेट्टनवर आणि विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाशजी अ. निकम, तसेच तहिसलदार व इतर अधिकाºयांनी घटना स्थळाला भेट देऊन ८ व्हीव्हीपॅट मशीनची पाहणी केले. बसवणं बागेवाडी पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली असून सदर व्हीव्हीपॅट मशीन कोणत्या मतदारसंघातील आहेत. आणि त्या याठिकाणी का फेकण्यात आल्या, यासंबंधी तपास हाती घेण्यात आला आहे. तपासानंतरच याचे गौडबंगाल स्पष्ट होणार आहे.
विजापूर जिल्ह्यात बसवण बागेवाडी तालुक्यातील मनगुळी गावानजीक एक पूल आहे. या पुलानजीक सध्या काम सुरू आहे. सदर काम करणाºया कामगारांना याठिकाणी आठ व्हीव्हीपॅट मशीन्स आढळून आल्या. त्यानंतर सदर कामगारांनी त्या मशीन्स एका शेडमध्ये ठेवल्या. यानंतर याबाबतची माहिती जिल्हाधिकारी व पोलिसांना देण्यात आली आहे. यासंबंधीचे वृत्त विजयपूर जिल्ह्यात व शहरात वाºया सारखे पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासकार्य हाती घेतले. तसेच विजयपूर शहर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार अब्दुल हमीद के. मुश्रीफ,बबलेसवर मतदार संघातून पराभूत झालेले भाजप उमेदवार विजूगौडा एस पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या व्हीव्हीपॅट मशीन्स विजापूर शहरातील असल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता त्यांनी पुलाखाली आढळून आलेल्या मशीन्स कोणत्या मतदारसंघातील आहेत याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच याचा तपास लागल्यानंतर संबंधितांवर कोणती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे़ निवडणूक आयोगाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येत असून लवकरच कडक कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी एस बी शेट्टनवर आणि विजयपूर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाशजी अ. निकम यांनी स्पष्ट केले़