या कामाचे टेंडरही निघाले असून, काही दिवसातच येथील बालोद्यान व अंतर्गत असलेल्या दोन पुतळ्यांंच्या परिसराचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शहरवासीयांना व बालगोपाळांना अत्याधुनिक बागेत फिरण्याचा आनंद लुटता येणार आहे. कुर्डूवाडी नगर परिषदेची एकमेव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बाग आहे. हे बालोद्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व पोलीस ठाण्याच्या अगदी समोर आहे. त्यामुळे शहरातील महिला, नागरिक व लहान मुलांना विरंगुळ्यासाठी सुरक्षित अशी ही बाग आहे.
आता येथील सर्व अत्याधुनिक कामाची प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेकांनी आनंदही व्यक्त केला आहे. या बालोद्यानाच्या परिसरात अहिल्यादेवी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे दोन पुतळे आहेत. या पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार आहे.
एक कोटी निधीमध्ये बालोद्यानाच्या संरक्षण भिंती व्यवस्थित करणे, अंतर्गत परिसरात पेव्हिंग ब्लॉक टाकणे, सौंदर्यात भर टाकणारी झाडे लावणे, शौचालय व वाचमन रूम अत्याधुनिक करणे, अंतर्गत खेळणी व साहित्य बदलणे, सर्व रंगरंगोटी करणे, संदेश भिंती तयार करणे व अंतर्गत भागात असलेल्या त्या दोन पुतळ्याचा परिसर सुशोभीकरण करणे अशा विविध प्रकारची कामे पूर्ण होणार आहेत.
फोटो- १५कुर्डूवाडी-बालोद्यान