सोलापूर : बोगस खते व बियाणे विकणाºया दुकानदारांवर प्रभावी कारवाई करा, असे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिले. याप्रकरणी १६ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून दोघे अटकेत आहेत. मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथे विनापरवाना खत बाळगणाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच पुढे चालू ठेवावी, असे आदेश त्यांनी कृषी अधिकाºयांना दिले.
खरीप हंगाम पेरणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे सोलापूर दौºयावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी बोगस खते व बियाणांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. करमाळा तालुक्यात बोगस रायासनिक खत आढळले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याची माहिती घेतली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात २७ टक्के पेरणी झाली आहे. युरियाचा पुरवठा कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे, हा प्रश्न तातडीने सोडविला जाईल. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा कमी असला तरी बार्शी व इतर ठिकाणच्या १0 शेतकºयांनी पेरणी केलेल्या बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली आहे.
कृषी अधिकाºयांच्या समितीमार्फत याचे तातडीने पंचनाम करून चौकशीा अहवाल सादर करा. पुन्हा अशी तक्रार येणार नाही याबाबत दक्ष रहा व असे बियाणे बाजारात असेल तर त्यावर कारवाई करा असे आदेश कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी कृषी अधिकाºयांना दिले. पीक कर्ज वाटपाचे १ हजार ४३८ कोटीचे उदिष्ट असून आत्तापर्यंत ३५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. १५ जुलैपर्यंत शंभर टक्के उदिष्ठ साध्य करा अशा सूचना बँक अधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या बँका उदिष्ठ साध्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उप संचालक रवींद्र माने, उपनिंबधक कुंदन भोळे. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे उपस्थित होते.
५६७ कोटींची कर्जमाफीकर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ७८ हजार ३१३ शेतकरी पात्र ठरले, यातील ६८ हजार २६0 शेतकºयांना ५६७ कोटी ४४ लाखाची कर्जमाफीची रक्कम जमा केली आहे. उर्वरीत शेतकºयांना लाभ दिला जाईल व योजनेतील सर्व शेतकºयांना पीककर्ज तातडीने द्यावे अशा सूचना केल्या आहेत, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
फळबाग योजना सुरू करणारकोरोना साथीमुळे कृषी योजनांना ब्रेक लागला आहे. पण आता आर्थिक स्थिती पाहून शेतकºयांच्या गरजेच्या फळबाग, ठिबकसिंचन आणि शेततळ्याची योजना सुरू करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मका, हरभरा केंद्राची अडचणमका व हरभरा खरेदी केंद्र सुरू करा अशी शेतकºयांची मागणी असली तरी राज्याचा कोटा संपला आहे. केंद्र शासनाकडून हा कोटा वाढवून मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
अहवालात ‘लोकमत’चे कात्रणकृषी विभागाने बोगस खते व बियाणेबाबत केलेल्या कारवाईबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांना सादर केलेल्या अहवालात ह्यलोकमतह्ण मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण जोडण्यात आले आहे. बोगस खते व बियाणांपासून शेतकºयांची फसवणूक होणार नाही याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.