लांबोटीच्या सरपंचपदी लक्ष्मी चट्टे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:28 AM2021-02-27T04:28:37+5:302021-02-27T04:28:37+5:30
लांबोटी : लांबोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी चट्टे-पाटील, तर उपसरपंचपदी भारत होनमाने यांची निवड करण्यात आली. सहा विरुद्ध तीन मतांनी ...
लांबोटी : लांबोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मी चट्टे-पाटील, तर उपसरपंचपदी भारत होनमाने यांची निवड करण्यात आली. सहा विरुद्ध तीन मतांनी चट्टे-पाटील या निवडून आल्या, तर होनमाने हे बिनविरोध निवडून आले आहेत.
मोहोळ तालुक्यात पूर्व भागातील लांबोटी गावाचा सरपंच कोण होणार? याबाबत उत्सुकता लागली होती. सरपंच पदाच्या आरक्षणाचा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेल्याने या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. लांबोटी गावचे सरपंचपद हे सर्वसाधारण खुल्या महिलेसाठी आरक्षित आहे. तानाजी खताळ यांच्या पत्नीचा शंभर मताने, तर इतर उमेदवारांचा दोनशे मताने पराभव करून सज्जनराव पाटील गटाने बाजी मारली. त्यानंतर सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळाली. लक्ष्मी चट्टे-पाटील यांच्या बाजूने भारत होनमाने, अमित पाटील, मोनिका मिरजे, विलास शिंदे, मनीषा खताळ या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले, तर विरोधी शुभांगी चंदनशिवे यांना दोन जणांनी समर्थन केले.
सरपंच पदाच्या निवडीनंतर गटाचे प्रमुख सज्जनराव पाटील, कुबेर वाघमोडे, विकास जाधव, ब्रम्हा चट्टे यांनी विजयी उमेदवारांचे कौतुक केले. या विजयासाठी चंद्रकांत जाधव, मारुती वाघमोडे, माजी सरपंच पप्पू कदम, शरद रनशिंगारे, आनंद व्यवहारे, दादा होनमाने, दादा गरड, संतोष रुपनर, मोहन खताळ, गणेश चट्टे, लखन माने, सर्जेराव पाटील, रवी पाटील, वैभव पाटील, संतोष मिरजे, अमर जाधव यांनी परिश्रम घेतले.
-----
२६ लांबोटी
लांबोटीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीनंतर गावकारभाऱ्यांनी असा जल्लोष केला.