मोहोळ येथे ज्येष्ठ निराधारांसाठी मोफत अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:07+5:302021-02-06T04:41:07+5:30
यावेळी सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रदीप काकडे, नागनाथ देवस्थानचे राजेंद्र खर्गे महाराज, शैलेश गरड, पद्माकर देशमुख, रामभाऊ खांडेकर, रामदास शेंडगे, ...
यावेळी सेवानिवृत्त कृषी अधिकारी प्रदीप काकडे, नागनाथ देवस्थानचे राजेंद्र खर्गे महाराज, शैलेश गरड, पद्माकर देशमुख, रामभाऊ खांडेकर, रामदास शेंडगे, बंडू गायकवाड, संजीव खिल्लारे, सुरेश राऊत, अजय कुर्डे, शहाजी देशमुख, विकास वाघमारे, महादेव यमगर, तानाजी दळवे, महेश शेंडगे, सुजित काळे, डॉक्टर भोसले, संजय सपकाळ, युवराज गायकवाड, अंजली काटकर, अश्विनी शिंदे, अनंत नागनकेरी, शंकर वाघमारे, अंकुश अवताडे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, दीपक चव्हाण, अमोल पवार, दत्ता कारंजकर, लिंगदेव निकम, नगरसेवक संतोष वायचळ, सागर लेंगरे, संतोष नामदे, विकास वाघमारे, नवनाथ चव्हाण, प्रवीण भोसले उपस्थित होते.
प्रास्ताविकात सतीश काळे म्हणाले, मोहोळ शहरामधील ज्येष्ठ निराधार व्यक्तींसाठी सोलापुरातील लोकमंगल अन्नपूर्णा योजनेच्या धर्तीवर मोहोळ सोशल फाउंडेशनतर्फे दिवसातून दोन वेळेस मोफत भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. मोहोळ शहर हे भूकमुक्त शहर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी सफाई कामगार, डॉक्टर यांना कोव्हीड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीमधील यशस्वी उमेदवारांचाही सत्कार करण्यात आला. समर्थनगर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.