जाणून घ्या; सोलापुरातील या पोलीस पती-पत्नीची गृहमंत्र्यांनी का घेतली दखल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 02:56 PM2020-08-25T14:56:40+5:302020-08-25T14:58:50+5:30
सोलापूर लोकमत विशेष...
मंगळवेढा : ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कष्ट करण्याची तयारी प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द ,चिकाटी असते पण योग्य दिशेने ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून आपण ग्रामीण भागातील गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तकासह इतर हजारो पुस्तकांचा संग्रह असणारी अभ्यासिका उभारणीसाठी व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाºया युवकांसाठी शारीरिक चाचणीचे साहित्य पोलीस दलातील पती पत्नीनी पुढाकार घेऊन तालुक्यातील रड्डे गावात उपलब्ध केले. नोकरीबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणा?्या या पती पत्नीच्या कायार्ची दखल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे त्यांनी या दोघांच्या कार्याबद्दल स्वत:च्या ट्विटर अकौंट वर कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यापासून २५ कि.मी अंतरावरील दुष्काळी रड्डे गावात अनेक सुविधा चा अभाव आहे. बहुतांश कुटूंबाचा ऊस तोडणी व्यवसायाशी अधिक संबंध येतो. गावात सुविधा चा अभाव असल्याने गाव सोडून जावे लागले. अनेक तरूणांनी जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. त्यामध्ये जिल्हाधिकारी झालेल्या तृप्ती दोडमिसे- नवत्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यकांत सपताळे यांच्या निवडीने गाव अधिक चर्चेत आले. त्यानंतर अनेक तरूणांनी स्पर्धा परिक्षेचा मार्ग निवडला.
स्पर्धा परिक्षा व पोलीस, सैन्य दलात भरती होण्यासाठी पुणे, मुंबई व अन्य अॅकॅडमीत पैसे भरून जावे लागले. पण गरीब तरूणांसमोर पैशाचा मोठा प्रश्न समोर आहेच. त्यातून प्रयत्न करणारे अनेक तरूण कोरोना संकटात गावी आले. त्या तरूणांचा अभ्यास व शारीरिक चाचणीत खंड पडू लागला पण संभाव्य पोलीस भरती अभ्यास व शारीरिक चाचणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकातील पोलीस नाईक लक्ष्मण कोळेकर व सुरक्षा शाखेतील त्यांच्या पत्नी पोलीस नाईक विद्या मळगे-कोळेकर यांनी केला.
रड्डे गावात स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करणा?्या युवकांसाठी सार्वजनिक अभ्यासिका साठी सर्व गावकºयांनी मदत देत एकाच वेळी ३२ विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था करून नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध केली. धावण्यासाठी मैदान, पुलअपसचे खांब, गोळा फेक मैदान, १०० मीटर मैदान तयार केले आहे.त्याचा लाभ गावात व परिसरात प्रयत्न करणाय्रा तरूणांना होऊ लागला.
बेरोजगारासाठी केलेल्या उपक्रमाबरोबर लोकांचा सहभागातून गावात श्रमदान करून गावात स्वच्छता करून ठिकठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. त्यांना गावातील विकास सांगोलकर, सिद्धनाथ कांबळे, रामा सपताळे, दिगंबर नवत्रे , अनिल थोरबोले, राजू गवळी, अजय सपताळे यांनी सहकार्य केले.
शिक्षण घेत मी प्लॉन्ट आॅपरेटर म्हणून काम करत भरतीची तयारी २००५ पासून केली. त्यात २००७ ला यश आले. पण ग्रामीण भागात परिस्थितीशी सामना करताना प्रयत्नशील युवकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला
- लक्ष्मण कोळेकर, पोलीस नाईक