सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात सुरू असलेले दुहेरीकरणाचे काम वेगाने करण्याबरोबरच सोलापूर स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट बसविण्यात येणार आहे. याबाबत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्यात बैठक झाल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील अधिकाºयांची भेट घेऊन विविध विकासकामांची माहिती घेतली. यावेळी अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही. के. नागर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार महास्वामी यांनी दुहेरीकरण, स्थानकावर प्रवाशांना पुरविण्यात येणाºया सेवासुविधा, सिद्धेश्वर एक्स्प्रेसला होणारा विलंब याबाबतची माहिती घेतली. आणखीन विकासकामे करण्यासाठी लवकरच खासदार व रेल्वेचे अधिकारी स्टेशन परिसराची पाहणी करू, असे बैठकीत ठरले.
दुहेरीकरण कामाचा घेतला आढावा- सोलापूर विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाबाबत खासदारांनी आढावा घेतला़ भिगवणपर्यंत दुहेरीकरणाचे काम रेल विकास निगम करीत आहे. भिगवण ते सोलापूर हे १६५ किलोमीटरचे अंतर आहे, त्यापैकी भिगवण ते वडसिंगे ९० किलोमीटरचे दुहेरीकरण काम अद्याप राहिले आहे़ त्यापैकी ३५ किलोमीटरचे काम पुढील दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदारांना सांगितली.
वाहतूक नियोजनासाठी दोन पोलिसांची नियुक्ती- रेल्वे स्थानकाबाहेर वाढलेले अतिक्रमण व होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्याचे बैठकीत ठरले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानकाबाहेर दोन वाहतूक पोलीस मागविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदारांना दिली़ याशिवाय स्थानकाबाहेरील अतिक्रमण ही समस्यासुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवणे आवश्यक असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदारांना सांगितले़
कुर्डूवाडी उड्डाण पुलासाठी चार कोटींची मागणी- सोलापूर मंडलातील कुर्डूवाडी रेल्वे उड्डाण पुलासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेल्वेला चार कोटी रुपये देणे आवश्यक आहे, याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून झाला आहे़ याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदार महास्वामी यांच्याकडे केली आहे़