एका स्मशानभूमीत दारू विक्री अन‌् दुसरीकडे वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:29+5:302021-07-30T04:23:29+5:30

पंढरपूर शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून चंद्रभागा नदी वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील तरुण झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने भीमा ...

Liquor is sold in one cemetery and sand is extracted in another | एका स्मशानभूमीत दारू विक्री अन‌् दुसरीकडे वाळू उपसा

एका स्मशानभूमीत दारू विक्री अन‌् दुसरीकडे वाळू उपसा

Next

पंढरपूर शहरासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून चंद्रभागा नदी वाहत आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील तरुण झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करतात. यामुळे पोलीस प्रशासनाकडून सतत वाळू उपसा करणाऱ्या, दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई होते मात्र, वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाकडून वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी कारवाई होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.

अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असते. मात्र, त्यांच्याकडूनही योग्य ती कारवाई केली जात नाही. यामुळे झोपडपट्टी परिसरात अवैधरीत्या दारू विक्री होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे दारूच्या व्यसनामुळे संसार मोडत आहेत.

शहरातील यमाई तुकाई तलावानजीक असलेल्या पुनर्वसित झोपडपट्टीमध्ये अवैधरीत्या दारू विक्री होत असल्याने आजूबाजूचे नागरिक हैराण झाले आहेत. याठिकाणी कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. गोपाळपूर रोडनजीकच्या लिगांयत स्मशानभूमीमध्ये दारूच्या पिशव्या पडल्या आहेत. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार आलेल्या महिलांना, वृद्धांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे राज्य उत्पादन विभागाने अवैध दारू विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

----

काही दिवसांपूर्वीच पंढरपूर शहरात अवैध दारू विक्रीवर कारवाई केली आहे. स्मशानभूमी येथे व अन्य ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.

-मेहबूब शेख, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पंढरपूर

---

नदीपात्राची पाहणी करण्यासाठी व शहरातील नदी पात्रातून वाळू उपसा रोखण्यासाठी पथक नेमणार आहे. त्याचबरोबर हे पथक सकाळी व संध्याकाळी असे दोनवेळा नदीपात्राची पाहणी करेल. वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल.

- राजेंद्र वाघमारे, तलाठी, पंढरपूर शहर

----

पंढरपूर गोपाळपूररोडजवळील लिंगायत स्मशानभूमीमध्ये पडलेल्या अवैध दारूच्या पिशव्या. (छाया : सचिन कांबळे)

वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाढवे हिंदू स्मशानभूमीत थांबलेली आहेत. (छाया : सचिन कांबळे)

Web Title: Liquor is sold in one cemetery and sand is extracted in another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.