लोकसभा निवडणूक : हलगीसाठी तीनशे; बल्क एसएमएससाठी एक हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:24 AM2019-03-19T10:24:01+5:302019-03-19T10:25:41+5:30

सोलापूर : उमेदवाराच्या प्रचारसभेपूर्वी हलग्या, तुतारी व बँजो लावण्यात येतात. अशाप्रसंगी एका हलगीवादकाला किमान तीनशे, बँजोतील एका वादकास पाचशे ...

Lok Sabha elections: 300 sq.ft. One thousand rupees for bulk SMS | लोकसभा निवडणूक : हलगीसाठी तीनशे; बल्क एसएमएससाठी एक हजार रुपये

लोकसभा निवडणूक : हलगीसाठी तीनशे; बल्क एसएमएससाठी एक हजार रुपये

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुकीत उमेदवाराकडून करण्यात येणाºया विविध वस्तू व सेवांच्या किमान खर्चाचे दरपत्रक निश्चित केलेअर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंत ७0 लाख रुपये खर्च करण्याची मुभा

सोलापूर : उमेदवाराच्या प्रचारसभेपूर्वी हलग्या, तुतारी व बँजो लावण्यात येतात. अशाप्रसंगी एका हलगीवादकाला किमान तीनशे, बँजोतील एका वादकास पाचशे रुपये प्रमाणे खर्च निश्चित करण्यात आला आहे. तुतारी वादनासाठी तीनशे रुपयांचा खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे. बल्क एसएमएससाठी एक हजार रुपये खर्च येणार आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवाराने मोटरसायकल रॅली काढली तर मोटरसायकलीच्या पेट्रोलसह चारशे रुपयांचा खर्च दाखवावा लागणार आहे. जीप वापरली तर तीन हजार ते तीन हजार ६00 रुपयांचा किमान खर्च प्रती दिवसाला याप्रमाणे उमेदवारास निवडणूक खात्याकडे द्यावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक उपजिल्हाधिकारी कार्यालयाने निवडणुकीत उमेदवाराकडून करण्यात येणाºया विविध वस्तू व सेवांच्या किमान खर्चाचे दरपत्रक निश्चित केले आहे. यापेक्षा कमी खर्च उमेदवारांना दाखविता येणार नाही.

१४ व्यक्तींच्या बसकरिता प्रती दिन ४ हजार ८00 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यापेक्षा जास्त ५0 पर्यंत आसन क्षमता असणाºया बसकरिता १३ हजार ५00 रुपये प्रती दिन भाडे निश्चित करण्यात आले आहे. कार वापरल्यास एका दिवसाकाठी एका कारला किमान २ हजार ७00 रुपयांचा खर्च दाखवावा लागणार आहे. वाहनचालकासाठी अतिरिक्त पाचशे रुपयेही नमूद करावे लागणार आहे. 
प्रचाराचे एक हजार पोस्टर प्रसिध्द केल्यास त्यासाठी तीन ते सहा हजार रुपयांचा खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे.

बॅलेट पेपर नमुन्याच्या छपाईकरिता किमान सातशे ते ३ हजार ८00 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. चहावर उमेदवाराने खर्च केल्यास प्रती कप पाच रुपयांप्रमाणे खर्च द्यावा लागणार आहे. दूध दिले तर २0 रुपयांचा दर लावण्यात येणार आहे. साध्या जेवणासाठी एका ताटास ६0 रुपये तर स्पेशल थाळीसाठी १२0 रुपयांचा दर उमेदवारास लावण्यात येणार आहे. कोल्ड्रिंक्ससाठी प्रती दोनशे एमएल बाटलीसाठी किमान २0 रुपयांचा खर्च उमेदवारास निवडणूक कार्यालयास सादर करावा लागणार आहे. 

प्रचार सभेत शंभर खुर्च्या वापरल्यास त्यासाठी दरदिवशी ५00 रुपयांचा खर्च दाखवावा लागणार आहे. सोफासेट वापरल्यास तीनशे ते सहाशे रुपयांचा खर्च एका सोफ्यासाठी दाखविणे आवश्यक आहे. लाऊड स्पीकरसाठी किमान १ हजार दोनशे रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. जनरेटरसाठी तीन हजार पाचशे रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रचारासाठी एलईडी वाहन वापरल्यास त्याकरिता एका वाहनास साडेचार ते पाच हजारांचा किमान खर्च उमेदवारास दाखवावा लागणार आहे.

उमेदवाराने निवडणुकीच्या काळात पथनाट्य किंवा लोककला आयोजित केल्यास यासाठी मात्र पाच हजारांचा किमान खर्च उमेदवारास दाखवावा लागणार आहे. 

७० हजारांच्या आतच खर्च होणे आवश्यक
- लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारास अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून ते मतमोजणीच्या दिवसापर्यंत ७0 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.या कालावधीत यापेक्षा जास्त खर्च झाल्यास निवडणूक उमेदवाराचे पद धोक्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक कार्यालयाने निश्चित केलेल्या दरानुसारच खर्च करण्याचा प्रयत्न उमेदवारांना करावा लागणार आहे. विहित दरापेक्षा कमी खर्च दाखविल्यास तो दर मान्य करण्यात येणार नाही.

शॉटस् पडणार महाग
प्रचारसभा किंवा रॅलीत शोभेच्या दारुच्या २४0 शॉट्सकरिता १ हजार ६00 रुपयांचा किमान खर्च दाखवावा लागणार आहे. त्यापेक्षा कमी १२0 शॉट्सच्या दारुसाठी ८00 रुपये खर्च दाखवावा लागणार आहे. एक हजार फटाक्यांची माळ लावल्यास त्यासाठी दीडशे तर पाच हजार माळासाठी ७५0 रुपयांचा खर्च गृहित धरण्यात येणार आहे. 

Web Title: Lok Sabha elections: 300 sq.ft. One thousand rupees for bulk SMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.