पंढरपूर : पशुधनाला चारा टंचाईवर मात करण्याबरोबर उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पशुपालकांनी उन्हाळ्यात परंपरागत व्यवस्थापनात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. गाय-म्हैस या पशुधनाची उत्पादकता वाढवायची असेल चाºयामध्ये गूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूळ, मीठ, खाण्याचा सोडा, ताक, लिंबू या पाच संजीवनींचा वापर करा़ जनावरांचा प्रकृती गुणांक टिकून चारा व पाणी टंचाईवर मात करता येते, असे प्रतिपादन परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी केले.
‘लोकमत’च्या वतीने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित ‘लोकमत अॅग्रोत्सवा’त दुसºया दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘दुष्काळी परिस्थितीत पशुसंवर्धन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी डॉ़ विश्वासराव मोरे उपस्थित होते़डॉ़ नितीन मार्कंडेय म्हणाले, राज्यात अन्य म्हशीपेक्षा पंढरपुरी शुद्ध म्हशींची संख्या सर्वाधिक आहे. आगामी चार महिने जनावरांना सांभाळले तर पुढे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही़ दुष्काळाची संकल्पना म्हणजे मोठा उन्हाळा, मात्र त्याची तीव्रता व काळ लांबला तर त्याला दुष्काळ म्हणतात़ या काळात जनावरांना पाण्याची कमतरता भासणार नाही, मात्र चाºयाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पशुपालकांनी उसाचे वाडे याबरोबर हायड्रोफोनिक्स चारा, फळफळांच्या साली, अजोला वनस्पतींचा वापर करावा. उन्हाळ्यात जनावरे किमान १८ तास बसायला पाहिजे. शिवाय त्यातील १४ तास ते रवंथ केले पाहिजे, यामुळे वातावरणातील ताण कमी होऊन दुधाची उत्पादकता आणि प्रजनन क्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.
दूध वाढीसाठी उपाययोजना
- - यावेळी वासीम येथील पशुपालक तीर्थराज पवार यांनी दूधवाढीसाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत प्रश्न विचारला असता डॉ़ मार्कंडेय म्हणाले, खुराकचे प्रमाण योग्य असावे, जनावरे व्याल्यानंतर पूर्ण झार पडला पाहिजे, गर्भाशय पूर्ण स्वच्छ झाले पाहिजे, जनावरांचे वजन वाढले पाहिजे, हाताने नव्हे तर मशीनच्या सहाय्याने दूध काढण्यास दूध उत्पादन नक्कीच वाढते आदी उपाययोजना डॉ़ मार्कंडेय यांनी सांगितल्या.
गोटा कोरडा ठेवावा...- चारा व पाणी व्यवस्थापनाबरोबर गोट्याच्या भिंतीवर तापमापक पाहिजे. गोट्याचे छत उंच हवे, पंजाबमध्ये ३६ फूट उंच गोठे आहेत. गोट्याला भिंतीची गरज नाही. वारा खेळणे व दुर्गंधीयुक्त वास निघून गेल्यास गोचीड व गोमाशांचा प्रादुर्भाव होणार नाही. उन्हाळ्यात जनावरांचे दावे १४ ते १५ फूट असावे. मुक्तसंचार गोट्यातील जनावरे दुप्पट दूध देतात. अपचन, पोटफुगी, उष्माघात या तीन अडचणींवेळी पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
जनावरांच्या अंगावर पाणी टाकण्यापेक्षा मालीश करा- जनावरांच्या अंगावर पाणी टाकण्यापेक्षा नारळाच्या केशराने त्यांची मालीश करणे गरजेचे आहे़ त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. जनावरांना ज्या टाकीतील किंवा पिंपातील पाणी पाजतो ते सावलीत ठेवावे. माणसाला नेहमी थंड पाणी लागते. थंड पाणी असेल तर बाटलीभर पाणी पितो. तसेच जनावरांनाही देण्यात येणारे पाणी हे थंड असावे़ जनावरांनी भरपूर पाणी पिले तर रवंथ चांगल्या प्रकारे होऊन पचनक्रिया सुधारते़ शिवाय जनावरांना निर्जंतुक पाणी देणे ही पशुपालकांची जबाबदारी आहे, या सोप्या गोष्टीकडे पशुपालकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे डॉ़ मार्कंडेय यांनी सांगितले.
ठराविक वेळेतच जनावरांना चारा द्यावा- कडबा पेंडी असो वा कुट्टी केलेला चारा जनावरांना पहाटे दिल्यास सेवन करण्याची प्रक्रिया ही सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण होत राहते. हा खाल्लेला चारा पुढच्या चार तासामध्ये पोटात उष्णता निर्माण करून ऊर्जा वाढविते. त्यामुळे बाहेरील उष्णतेचा जनावरांच्या शरीरावर परिणाम होत नाही. त्यानंतर पुढच्या चार तासामध्ये जनावरांना कोणताही चारा न देणे कटाक्षाने पाळले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना दुपारी अडीचनंतर पहाटे ४ वाजेपर्यंत चारा दिल्यास त्याचा कोणताही त्रास होत नसल्याचे सांगितले.
उसाचे वाडे एक दिवस सूर्यप्रकाशात ठेवून वापरा- पशुपालकांनी उसाचे वाडे आणल्याबरोबर जनावरांपुढे लगेच टाकणे चुकीचे आहे. किमान एक दिवस सूर्यप्रकाशात वाळत ठेवून त्यावर चुन्याची निवळी टाकून दिल्यास क्षार संयोजनाची प्रक्रिया सुलभ होऊन त्याचा जनावरांना त्रास होणार नाही. तसेच उसाचे वाडे मुरघास करून वापरले तर चाºयाचे नियोजन योग्य होईल. १८ ते २२ फूट उंच जाणारा कोईमतूर बियाणांचा वापर चाºयासाठी पशुपालकांनी करण्याची गरज आहे. जनावरांचे ४० ते ७० किलो क्षमतेचे पोट असून ते रोज भरले पाहिजे. त्यासाठी विविध फळांच्या साली द्याव्यात.