कुर्डूवाडीत विषय समित्यांवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:12+5:302021-01-08T05:12:12+5:30
पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश चव्हाण उपस्थित होते. त्याला सहायक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी काम पाहिले आहे. ...
पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश चव्हाण उपस्थित होते. त्याला सहायक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी काम पाहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ऑनलाईन घेण्यात आली. सर्व नगरसेवकांनी सहभाग नोंदवित आपले मत व्यक्त केले.
यावेळी नगरपरिषद कार्यालयातून ऑनलाईन बैठकीचे कामकाज नगराध्यक्ष समीर मुलाणी, मुख्याधिकारी समीर भूमकर, अतुल शिंदे, रवींद्र भांबुरे, नितीन आखाडे यांनी पाहिले. या बैठकीस नगरसेवक धनंजय डिकोळे, प्रकाश गोरे, आनंद टोणपे, निवृत्ती गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यांची झाली निवड
सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समितीच्या सभापतिपदी बबन लक्ष्मण बागल, तर सदस्यपदी वनिता सातव, अनिता साळवे, निवृत्ती गोरे, आनंद टोणपे यांची निवड करण्यात आली. याबरोबरच सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आणि महिला बालकल्याण समिती सभापतिपदी राधिका धायगुडे यांची, तर सदस्यपदी नंदा वाघमारे, जनाबाई चौधरी, अयुब मुलाणी, शांता पवार यांची निवड झाली. तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी दमयंती सोनवर यांची व सदस्यपदी अनिता साळवे, जनाबाई चौधरी, संजय गोरे, शहनाज मुलाणी यांची निवड करण्यात आली. याबरोबरच शिक्षण समितीवर सभापती म्हणून पदसिद्ध उपनगराध्यक्षा उर्मिला बागल यांची, तर सदस्यपदी नंदा वाघमारे, वनिता सातव, अरुण काकडे, शांता पवार यांची निवड झाली. स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्ष समीर मुलाणी यांची, तर सदस्यपदी सर्व विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली.
.......................