माळशिरस तालुका राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त; जाणून घ्या नेमकं काय काहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 02:46 PM2021-07-09T14:46:35+5:302021-07-09T14:47:22+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Malshiras NCP executive dismissed; Read why District President Sathe took action | माळशिरस तालुका राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त; जाणून घ्या नेमकं काय काहे कारण

माळशिरस तालुका राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त; जाणून घ्या नेमकं काय काहे कारण

googlenewsNext

सोलापूर: माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्याने घोषित केलेली कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिली.
  राष्ट्रवादीचे शंकर देशमुख यांनी माळशिरस तालुका कार्यकारिणी जाहीर केली होती. माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून माणिक वाघमोडे यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीबाबत प्रदेश राष्ट्रवादीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर प्रदेश कमिटीतील शिवाजी गरजे यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याची सूचना जिल्हाध्यक्ष साठे यांना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे यांनी शुक्रवारी माळशिरस तालुक्याची नवीन कार्यकारणी बरखास्त करण्याची कारवाई केली.

विधानसभा निवडणुकीनंतर या तालुक्यात दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाने आपल्यालाच पदे मिळावित असा प्रदेश कमिटीकडे आग्रह धरला आहे. तालुक्यात काम करण्यासाठी  एका गटाने निवडी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या गटाने प्रदेश कमिटीकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यकारिणी बरखास्त केल्याबाबत काही अडचण असल्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे संपर्क साधावा असे जिल्हाध्यक्ष साठे यांनी त्या पदाधिकाऱ्यांना सूचना केली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे राजकारण आणखीन तापले आहे.

 

Web Title: Malshiras NCP executive dismissed; Read why District President Sathe took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.