सोलापूर: अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी केल्याचे आंबा महोत्सवात पाहावयाला मिळाले. गर्दीच्या प्रमाणात स्टॉलची संख्या कमी असल्याने आंबा खरेदीदारांची अडचण झाल्याचे दिसून आले. रविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्री झाल्याचे सांगण्यात आले. शहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षयतृतीयेचा मान आहे. अक्षयतृतीया मंगळवारी असल्याने सोमवारी आंबा खरेदीसाठी सोलापूरकर आंबा महोत्सव, सातरस्ता, बाजार समिती व अन्य ठिकाणच्या बाजारात दिसून आले. महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. कोकणातील शेतकºयांचा आंबा येथे मिळत असल्याने खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी अपुरी जागा, गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सोय नसल्याने अनेकांनी आंबा खरेदीसाठी आत न जाता बाहेरुनच जाणे पसंद केले. अतिशय कमी जागेत अवघ्या २० स्टॉलची सोय करण्यात आली आहे. स्टॉल कमी अन् शेतकºयांची नोंदणी अधिक असे चित्र आंबा महोत्सवात झाले आहे.
२७ शेतकºयांनी आंबा महोत्सवासाठी नोंदणी केली असून, स्थानिक शेतकºयांना नोंदणी न केल्याने विक्रीसाठी दरवर्षीप्रमाणे संधी मिळाली नाही. सोमवारी सायंकाळी २० स्टॉलपैकी पाच स्टॉल आंबा संपल्याने रिकामे होते. नोंदणी केलेले शेतकरी आंबा विक्रीसाठी सोलापुरात येण्यासाठी इच्छुक असले तरी लावलेल्या स्टॉलवरील आंबा कधी संपतो?, याचा अंदाज येत नसल्याने कोकणातील शेतकरी कोकणातच अडकले आहेत. महोत्सवातील स्टॉलवर एक डझन आंब्याचा दर ५०० रुपये व त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. सातरस्ता व अन्य ठिकाणी ८० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत एक डझन आंब्याची विक्री झाली.
आंबा कमी पडणार नाही-नाईक- स्टॉल उभारणीसाठी जागा मिळाली नाही. अपुºया जागेत स्टॉलची उभारणी करावी लागली. सोलापूरकरांना आंबा कमी पडणार नाही. कोकणातून पुण्याकडे जाणारा आंबा सोलापुरला मागविला आहे. ज्या शेतकºयांचा आंबा संपला आहे अशा ठिकाणी नोंदणी केलेले कोकणातील शेतकरी मंगळवारी आंबा घेऊन येत असल्याचे कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक दिलीप नाईक यांनी सांगितले.