अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील रबर फॅक्टरीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी
By Appasaheb.patil | Published: February 15, 2023 08:08 AM2023-02-15T08:08:48+5:302023-02-15T08:12:09+5:30
एमआयडीसी मधील रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती.
सोलापूर : सोलापूर शहराच्या लगतच असलेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका रबर फॅक्टरीला बुधवारी पहाटेच्या सुमारास मोठी आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या २५ गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एमआयडीसी मधील रबर फॅक्टरीला आग लागल्यानंतर आसपासच्या गारमेंट कारखान्यांनाही आगीने घेरले. मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेली आग सकाळी साडेसहापर्यंत धुमसत होती. सोलापूर महापालिका, तसेच एमआयडीसी, एनटीपिसी, अक्कलकोट शहर, बार्शी येथून २० ते २५ अग्नीशमन गाड्या पाचारण करूनही आग आटोक्यात आली नाही. परिसरातील ईतर कारखानदार हवालदिल झाले. मिळेल ते साहित्य हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मनपाचे केदार आवटे यांच्यां सह ,२५ जणांची टीम आग नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली होती.
अक्कलकोट रोड एमआयडीसीमधील रबर फॅक्टरीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी#fire#solapur#Fire Brigade pic.twitter.com/TLV2HwdMOl
— Lokmat (@lokmat) February 15, 2023
यावेळी सोलापूर शहर पोलीस फौज फाटा तळ ठोकून आहे, आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे समजते. कोटीपेक्षा अधिक मालमत्ता भस्मसात झाली अशी प्राथमिक माहिती आहे.