राज्यात सुख शांती नांदावी, वारीची परंपरा कायम सुरू राहावी; अजित पवारांचे विठ्ठलाकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 05:50 AM2021-11-15T05:50:46+5:302021-11-15T05:51:19+5:30

आज कार्तिक एकादशी; अजित पवारांच्या हस्ते पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

May peace and prosperity prevail in the state, the tradition of Wari should continue forever; Ajit Pawar's visit to Vitthal | राज्यात सुख शांती नांदावी, वारीची परंपरा कायम सुरू राहावी; अजित पवारांचे विठ्ठलाकडे साकडे

राज्यात सुख शांती नांदावी, वारीची परंपरा कायम सुरू राहावी; अजित पवारांचे विठ्ठलाकडे साकडे

Next

पंढरपूर /सोलापूर :  राज्यात सुख शांती नांदावी. वारीची परंपरा कायम सुरू राहावी, यासाठी विठ्ठलाकडे साकडे घातल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर येथे आले होते. महा पूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, विशेष प्रशासकीय अधिकारी सचिन ढोले,  हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, साधना भोसले, शकुंतला नडगिरे, तलाठी राजेन्द्र वाघमारे, मंडळ अधिकारी विजय शिवशरण उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या चायना , रशिया व युरोप मध्ये कोरोनाने तोंडवर काढले आहे. आरोग्य विभागाच्या सुचानेनेच नागरिकांनी कोरोना बाबत उपचार घ्यावेत. कोरोना संपला नाही. प्रत्येकाने दुसरा डोस देखील घ्यावा असे आवाहन राज्यातील जनतेला पवार यांनी केले.

Web Title: May peace and prosperity prevail in the state, the tradition of Wari should continue forever; Ajit Pawar's visit to Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.