करमाळा बाजार समितीची सभा सहायक निबंधकांच्या पत्रामुळे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:16 AM2021-07-20T04:16:59+5:302021-07-20T04:16:59+5:30
सभेचा अजेंडा नियमानुसार १० दिवस अगोदर काढला पाहिजे, अशी उपविधीत स्पष्ट तरतूद आहे. असे असताना व २९ जून रोजी ...
सभेचा अजेंडा नियमानुसार १० दिवस अगोदर काढला पाहिजे, अशी उपविधीत स्पष्ट तरतूद आहे. असे असताना व २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय अपेक्षित असताना २१ मे रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करण्याबाबतचा एकच विषय घेऊन १९ जुलै रोजी सभा आयोजित करण्याचा सभापतींचा प्रयत्न होता, असे संचालकांचे म्हणणे आहे.
-----
सभेसंबंधी मला कसलीच माहिती नाही. संचालक गुगळे व दोशी यांनी विचारणा केल्यानंतर व सहायक निबंधकांचे पत्र मिळाल्यानंतरच मला समजले. सहायक निबंधक यांय्या पत्रानुसार कायदेशीर कामकाजच करणार आहे. बेकायदा कामकाजास थारा दिला जाणार नाही. बाजार समितीची दैनंदिन कामे संस्थेचे हित व प्रगती डोळ्यासमोर ठेवून सुरू आहेत.
- विठ्ठल क्षीरसागर, कार्यरत सचिव बाजार समिती करमाळा