करमाळ्यात बाबूशेठ या नावाने सर्वदूर परिचित असलेले श्रीकांत गणपत रच्चा यांचा मुलगा खरेदीसाठी सोलापूरला गेला होता, तर पत्नी आजारी असल्याने बाबूशेठ यांनी स्वत: त्यांना गावातील दवाखान्यात जाण्यासाठी मेनरोडवरील जुन्या घरी सोडले. त्यानंतर ते सिंचननगर परिसरात असलेल्या घरी आले. दुपारी १२ च्या दरम्यान त्यांनी कामगार शाहरूखला बागवान नगरमध्ये साईटवर जायचे म्हणून फोनवरून बोलावून घेतले. कामगार शाहरूख त्यांच्या घराचे वरच्या मजल्यावर गेला असता, दारातच फरशी कापण्याच्या कटरने गळा कापल्याचे दिसले. बाबूशेठ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्यावर त्याने इतरांना बोलावून घेतले. ते मरण पावल्याची खात्री पटल्यावर पोलिसांना कळवले. या प्रकरणी पोलिसांनी ाआकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. नेमका खून की आत्महत्या हे तपासातून निष्पन्न होईल. दुपारी मृतदेह मिळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
...............
फोटो २१करमाळा रच्चा