दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:42 PM2018-07-18T12:42:07+5:302018-07-18T12:45:30+5:30

पंढरपूरातील तीन लाख लिटर दूध संकलन थांबले, शेतकºयांचा १०० टक्के पाठिंबा; विक्रीसाठी दूध आणलेच नाही 

Milk shut agitation hit the ward of the Pandharpur | दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका

दूध बंद आंदोलनाचा पंढरपूरातील वारकºयांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देआषाढी वारी सोहळा अवघ्या चार दिवसांवरदूध उत्पादक शेतकºयांनी आंदोलनाला १०० टक्के पाठिंबादूध आंदोलनाचा सर्वाधिक फटका वारकºयांना

पंढरपूर : दूध बंद आंदोलनाच्या दुसºया दिवशी दूध उत्पादक शेतकºयांनी आंदोलनाला १०० टक्के पाठिंबा देत शहरात दूधच पाठविले नाही़ त्यामुळे तालुक्यातून तब्बल ३ लाख लिटर दूध संकलन थांबले़ परिणामी याचा सर्वाधिक फटका वारकºयांना बसला़ 

आषाढी वारी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे़ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी जिल्ह्यात प्रवेश केला़ बुधवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे़ त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत़ पंढरीतील स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, भक्तीमार्ग, सरगम चौक, एस़ टी़ स्टँड परिसरातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत़ मठ, मंदिर, समाजमंदिर, धर्मशाळा आदी ठिकाणीही वारकºयांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे़

पायी प्रवास करून आलेले किंवा वाहनातून आलेल्या वारकºयांना थकवा आला होता़ त्यामुळे गरम चहा पिऊन थकवा घालवावा म्हटले तर शहरातील एकाही दूध संकलन केंद्रावर दूध उपलब्ध नव्हते़ नंतर हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यावे म्हटले तरी हॉटेलमध्येही चहा मिळाला नाही़ त्यामुळे या दूध आंदोलनाचा सर्वाधिक फटका वारकºयांना बसल्याचे दिसून येते़

जनावरांचे पशुखाद्य, पेंड, दवाखान्याचा खर्च, चारा महागल्याने जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे़ त्यात केवळ १७ रुपये लिटरने दूध विक्री करणे परवडत नाही़ त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा़ राजू शेट्टी यांनी दूर वाढीसाठी शहरात जाणारे दूध बंद करण्याचे आवाहन शेतकºयांना केले होते़ आपल्याला दुधाला जादा दर मिळण्यासाठी खा़ राजू शेट्टी लढा देत असतील तर त्यांना पाठिंबा म्हणून शेतकºयांनीही शहरात दूध पाठविणे बंद केले़ परिणामी शहरात दूध न आल्याने सर्व दूध संकलन केंदे्र बंद होती़ 

हे संकलन केंदे्र बंद
- दूध पंढरी, सुहासिनी, नकाते, संस्कार, हौसेकर, भागानगरे, वैष्णवी, अमोल, हॅटसन, राजाराम यासह अन्य किरकोळ दूध संकलन केंद्रांनी मंगळवारी दूध संकलन केले नसल्याचे विक्री करण्याचा प्रश्नच येत नाही़ या पंढरपूर शहरातील सर्व दूध संकलन केंद्रांनीही दूध बंद आंदोलनास १०० टक्के पाठिंबा दिला़ 

दुपारी हॉटेलमध्येही चहा मिळेना!
- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शहरात वारकºयांची मोठी गर्दी झाली आहे़ सकाळी हॉटेलमध्ये चहा मिळत होता; मात्र त्यांच्याकडील शिल्लक दूध संपल्याने दुपारनंतर अनेक हॉटेलमध्ये चहा मिळेनासा झाला़

दुधाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलन सुरू आहे़ एक-दोन दिवस नुकसान होईल, पण दूध दर वाढ झाल्यास शेतकºयांना फायदा होईल़ सरकारनेही शेतकºयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर कोंडी फोडावी़
-शशिकांत कराळे,
सुहासिनी दूध डेअरी प्रमुख

दूध उत्पादक शेतकºयांना आणि दूध संकलन करणाºयांनाही वारकºयांची व शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये असे वाटते, पण दूध दर वाढीचा निर्णय झाला पाहिजे़ शेतकºयांना जादा दर मिळाला तर आनंदच आहे़
-गणेश पाटील,
दूध संकलन केंद्रप्रमुख

Web Title: Milk shut agitation hit the ward of the Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.