वीजप्रश्नाबाबत आमदारांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:15+5:302021-01-13T04:57:15+5:30

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी चांगली आहे. मात्र वीज वितरणबाबत असलेल्या अडीअडचणींमुळे विद्युतपुरवठ्यासंदर्भात शेतकरी ...

MLA's statement to Energy Minister regarding power issue | वीजप्रश्नाबाबत आमदारांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन

वीजप्रश्नाबाबत आमदारांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन

googlenewsNext

यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी चांगली आहे. मात्र वीज वितरणबाबत असलेल्या अडीअडचणींमुळे विद्युतपुरवठ्यासंदर्भात शेतकरी अनेकवेळा आमदार राम सातपुते यांच्याकडे तक्रारी करतात; मात्र निधीअभावी रखडलेल्या कामांमुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान होत असल्याची ऊर्जामंत्र्यांसोबत आ. राम सातपुते यांनी चर्चा केली. यासंबंधी धोरणांचा अवलंब झाल्यास तालुक्यातील कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

हे प्रश्न मांडले...

गणेशगाव व एकशिव येथे ३३/११ केव्हीच्या उपकेंद्रास मंजुरी मिळावी, महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत केबल टाकून वीज कनेक्शन दिलेल्या शेतकऱ्यांना लाइन व ट्रासफार्मर उभारणी करून पायाभूत सुविधा निर्माण करावी. सिंगल फेज योजनेच्या ठिकाणी गावठाण फीडर उभारणीसाठी मंजुरी द्यावी, ओव्हरलोड वाहिन्यांवरील भार कमी करण्यासाठी नवीन वाहिन्यांना मंजुरी द्यावी, या प्रमुख मागण्यांसह महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन आ. राम सातपुते यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले.

फोटो :::::::::::::::::::

विजेसंदर्भातील विविध मागण्यांचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन देताना आ. राम सातपुते.

Web Title: MLA's statement to Energy Minister regarding power issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.