सोलापूर: जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या करण्याचा मुहूर्त संचारबंदीनंतर धरण्यात आला आहे. शिक्षक वगळून जिल्हा परिषदेच्या १२ हजार २७१ कर्मचाºयांपैकी मात्र कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.
शासनाने प्रत्येक विभागातील १५ टक्के कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शहरात १७ ते २७ जुलै दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बदल्या २८ ते ३१ जुलै दरम्यान होतील.
२८ जुलै रोजी अर्थ, कृषी, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन या विभागातील कर्मचाºयांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होतील. २९ जुलै रोजी आरोग्य, बांधकाम, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील बदल्या होतील. ३१ जुलै रोजी पंचायत समिती व आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जातील शिवरत्न सभागृहात बदल्यांचे कामकाज चालणार आहे.