गुडेवारांच्या बदलीमुळे आंदोलन पेटू लागले !

By admin | Published: June 24, 2014 01:24 AM2014-06-24T01:24:07+5:302014-06-24T01:24:07+5:30

गुरुवारी सर्वपक्षीय सोलापूर बंद : माकप, बसपाची निदर्शने

Movement of gudwaras began to agitate! | गुडेवारांच्या बदलीमुळे आंदोलन पेटू लागले !

गुडेवारांच्या बदलीमुळे आंदोलन पेटू लागले !

Next


सोलापूर: महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीमुळे सोलापुरातील आंदोलन पेटू लागले आहे़ सोमवारी बसपाच्या वतीने सह्याची मोहीम घेतली, काँग्रेसच्या नेत्यांचा पुतळा दहन केला तर माकपने प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली़ आमदार आडम मास्तर यांनी गुडेवारांची बदली रद्द करण्याची मागणी केली तर सर्वपक्षीय नेत्यांनी मनपा हिरवळीवर बसून २५ जून रोजी सर्वपक्षीय बंद पुकारला आहे़
आयुक्त गुडेवार यांनी मनपा कामकाजात पारदर्शकता आणली. काही कटू निर्णय घेतल्यामुळे अनेक जण दुखावले मात्र महापालिकेचे उत्पन्न वाढविल्यामुळे शहरात अनेक विकासाची कामे सुरू झाली, अनेकांच्या देय रकमा मिळू लागल्या, परिवहन खात्याला २०० नव्या बस मंजूर झाल्या, गुडेवारांनी केलेल्या कामांचा पाडा यावेळी आंदोलनकर्त्यांनी वाचला़ आडम मास्तर यांनी दोन तास मनपा प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला़ यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, एम़एच़ शेख, नसिमा शेख, माशप्पा विटे, व्यंकटेश कोंगारी आदींनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले़ बसपाचे नेते आनंद चंदनशिवे यांनी पार्क चौकात गुडेवारांची बदली करू नये यासाठी सकाळपासून सह्यांची मोहीम घेतली़
-------------------------------
कर्मचाऱ्यांकडून साधा निषेधही नाही
ज्या मनपा कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी नियमित वेतन सुरू केले, ज्यांना वर्षभरात ४० टक्के पगारवाढ दिली, ज्या कर्मचाऱ्यांना लाड कमिटीच्या शिफारशी लागू केल्या अशा कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष आयुक्त गुडेवार यांची बदली झाल्यानंतर साधा निषेधसुद्धा नोंदविला नाही़ कामगार नेते अशोक जानराव यांनीदेखील गप्प राहणे पसंद केले़ कामगार कृती संघटनेचे पदाधिकारी काही झाले की रस्त्यावर येतात, सोमवारी मात्र त्यांची भूमिका मात्र संशयास्पद होती़ गुडेवारांच्या बदली प्रकरणातील कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असे पत्रक मनपा सहायक आयुक्तांनी सोमवारी सकाळीच काढले होते़
---------------------------------------
काँग्रेस, राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्ष एकत्र
मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगळता सेना, भाजप, माकप, बसपा, रिपाइं आदींची सोमवारी सायंकाळी मनपा हिरवळीवर बैठक झाली़ गुरुवारी सर्वपक्षीय बंद करण्याची सूचना यावेळी करण्यात आली़ प्राथमिक निर्णय घेण्यात आला़ अंतिम निर्णय मंगळवारी घेण्यात येणार आहे़ या बैठकीस आ़ विजयकुमार देशमुख, माजी आमदार आडम मास्तर, बसपाचे आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, भाजपचे प्रा़ अशोक निंबर्गी, मनसेचे युवराज चुंबळकर आदी उपस्थित होते़
------------------------------------------
पुतळा जाळला, किरकोळ तोडफोड
आयुक्तांच्या बदलीमुळे शहरातील काही संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत़ काही जणांनी सोमवारी सायंकाळी महापौर कार्यालय तसेच कौन्सिल हॉलमधील कार्यालये शटडाऊन केली तर दोन ठिकाणी खिडक्यांच्या काचा फोडल्या़ बसपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आपला राग व्यक्त केला, तर आडम मास्तर यांनी बदलीमागे सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचंड दबाव होता़ लोकसभेला पराभूत झाले तरीही ते सुधारले नाहीत, असा आरोप मनपा प्रवेशद्वारावरील आंदोलनात केला़

Web Title: Movement of gudwaras began to agitate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.