वाहनमालकांना कोट्यवधींचा गंडा घालून मुकादम फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:03+5:302020-12-05T04:47:03+5:30
औदुंबर उबाळे, आनंद कांबळे, बाजीराव चव्हाण, दादासाहेब बारबोले यांच्यासह परिसरातील २० ते २५ वाहनधारकांची दीड ते दोन कोटी रुपयांची ...
औदुंबर उबाळे, आनंद कांबळे, बाजीराव चव्हाण, दादासाहेब बारबोले यांच्यासह परिसरातील २० ते २५ वाहनधारकांची दीड ते दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने ही देणी कशी द्यायची हा प्रश्न या वाहनधारकांच्या समोर उभा राहिला आहे. कारखान्याच्या हंगामापुरता हा व्यवसाय असल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे उचल दिलेले पैसे कधी परत मिळायचे व कसे घ्यायचे या चिंतेमध्ये वाहनधारक आहेत. काही फसवणूक करणाऱ्या या मुकादम व कामगारांमुळे ऊसतोड कामगारही बदनाम होऊ लागले आहेत. फसणूक करणाऱ्या मुकादमावर कारवाईची मागणी वाहनधारक करीत आहेत.
असा ठरतो व्यवहार
नोटरी कराराच्या माध्यमातून कामगार पुरवण्यासाठी मुकादम वाहनधारकांकडून सात ते आठ लाख रुपये उचल घेतात. कारखान्याकडील आलेले पैसे व स्वतःकडील रकमेची जुळवाजुळव करीत वाहनधारक मुकादमाकडे पैसे देतात. त्यानुसार अनेक वाहनधारकांनी कामगारासाठी मुकादमाला पैसे दिले, मात्र पैसे घेऊन मुकादम व कामगार फरार झाल्याने वाहन मालकाला संबंधित ठिकाणाहून मोकळ्या हाताने परतावे लागत आहे.
कोट :::::::::::
साखर कारखान्याबरोबर वाहनाचा करार केला. त्यानंतर ऊस तोडण्यासाठी कामगार पुरवण्याचा करार करून त्यासाठी कारखान्याबरोबरच स्वतःचे पैसे गुंतवून सहा लाख रुपये बँकेच्या व रोखीच्या माध्यमातून मुकादमांना दिले; मात्र कारखाना सुरू होताच मुकादमकडे कामगारासंदर्भात विचारणा करताच मुकादम मोबाईल बंद करून अज्ञात ठिकाणी निघून गेल्याने मोठा धक्का बसला. व्यवसाय तर बुडालाच मात्र कारखान्याचे देणे व ट्रॅक्टरचे हप्ते कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- औदुंबर उबाळे,
वाहनधारक दारफळ सीना.