‘ग्रीन फिंगर्स’ला राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:16 AM2021-07-10T04:16:01+5:302021-07-10T04:16:01+5:30
स.म.कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून सन १९७५ साली द ग्रीन फिंगर्स स्कूल ही निवासी इंग्रजी ...
स.म.कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टच्या माध्यमातून सन १९७५ साली द ग्रीन फिंगर्स स्कूल ही निवासी इंग्रजी माध्यम शाळा सुरु केली. गेली ४५ वर्षे या स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व विकासात सातत्य ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शैक्षणिक धोरणांचा उत्कृष्टपणे अंमल करुन शाळेचा नावलौकिक केला आहे. हायपेज मीडिया व आय कॅन फाउंडेशन या राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थेने याची दखल घेऊन द ग्रीन फिंगर्स स्कूलला राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता व उत्कृष्ट निवासी शाळा हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, वरिष्ठ विश्वस्त सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, सचिव धैर्यशील मोहिते-पाटील, स्कूलचे चेअरमन नितीन इंगवले-देशमुख यांनी प्राचार्य पी. एस. जॉर्ज, प्रशासन अधिकारी बी. एन. याबाजी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
090721\img-20210708-wa0035.jpg
द ग्रीन फिंगर्स स्कुलला मिळालेली ट्राॅफी