नवलाई...थुई थुई नाचणारी लाजाळू टर्की कोंबडी सर्वाचेच आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:58 PM2019-11-18T12:58:41+5:302019-11-18T13:02:36+5:30
कुर्डूवाडीत होतयं संगोपन; वजन तिचं २० किलो अन् उडी मारते २० फूट अंतरावरपर्यंत
कुर्डूवाडी : जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया कुर्डूवाडी शहरामध्ये शौकिनांची संख्या काही कमी नाही. इथलं एक कुटुंब वेगळ्याच कारणामुळं चर्चेच्या झोतात आलं आहे. लाजाळूू अन् थुई थुई नाचणाºया टर्की कोंबडीचं संगोपन केलं आहे. तिचा नाच पाहण्यासाठी परिसरातील बालगोपाळांची एकच गर्दी होतेय. वजनाने २० किलो असली तरी ती चक्क २० फूट अंतरावर उडी मारत असल्याचे सांगण्यात येतंय.
बार्शी नाक्यावरील आयाज गुलाब शेख यांच्या कुटुंबीयांनी या अनोख्या टर्की कोंबडीचं संगोपन सुरु केलंय. यामुळेच की काय ते कुर्डूवाडीसह पंचक्रोशीत प्रसिध्द झाले आहेत. ही कोंबडी अंदाजे २० किलो वजनाची असून, ती साधारण २० फुटांच्या अंतरावर झेप घेते. तिचा नाच मोरासारखा पिसारा फुलवून असल्याने तो मोहक असतो, हा नाच पाहण्यासाठी आजूबाजूचे बालगोपाळ, आबालवृद्ध मंडळी आवर्जून येतात,असं आयाज शेख सांगतात.
सध्या मार्केटमध्ये देशी कोंबडी, विलायती कोंबडी, क्रॉस जनरेशन, काळी मुर्गी अशा विविध जाती आहेत, मात्र टर्की मुर्गी ही संकल्पनाच शहरवासीयांसाठी नवीन आहे. या कोंबडीचे वजन पूर्ण विकसित झाल्यानंतर साधारणत: २० किलोपर्यंत भरते व तिचे आयुष्य १२ ते १५ वर्षांपर्यंत असते.
अन्य कोंबड्यांप्रमाणेच या कोंबडीचेही गहू, ज्वारी, मका, बाजरी, तांदूळ असे खाद्य आहे. मात्र या कोंबडीसाठी हे धान्य एकत्र करुन भरडून आणावे लागते. याची वाढ झपाट्याने होते. दिसायला सुंदर आहेक़ोंबडी आजारी पडल्यावर टेटरासायकक्लीन नावाचे औषध पाण्यात मिसळून दिल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही. या टर्की मुर्गीचे अंडेही देशी कोंबड्यांपेक्षा मोठे असून, त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात याची मार्केटमध्ये किंमत ८० ते १०० रुपयांपर्यंतच असल्याचे आयाज शेख म्हणाले.
ही कोंबडी व तिच्या अंड्यापासून लोहरस व कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळत असल्याचा दाखला यूट्यूबवर पाहायला मिळतो. या कोंबडीला मोठ्या शहरातील हॉटेलात मागणी असल्याचं शेख सांगतात.
देशी कोंबडीनं उबवली टर्कीची अंडी
आयाज यांचे बंधू रियाज यांनी या टर्की मुर्ग्या पाहून त्यांची १० अंडी विकत आणली व ती देशी कोंबडीच्या खाली उबवून घेतली. यानंतर त्यातून टर्की प्रजातीची १० पिल्लं तयार झाली व ती देशी कोंबडीच्या मागे फिरुन मोठी केली. यात त्यांना खाद्य देऊन आठ दिवसांतून एकदा फॅशनील नावाचे जंतनाशक पाजण्यात आले़ त्यांची योग्य ती देखभाल केल्याने ही पिल्ली मोठी झाली.
मोरासारखा फुलवते पिसारा
- शेख यांच्याकडे सध्या २ मादी व ३ नर अशा ५ टर्की कोंबड्या आहेत. ही जात अगदी लाजाळू आहे. हे पक्षी आनंदी झाल्यानंतर त्यांच्या चोचीवर चरबीसारखा पदार्थ अगदी १० इंचापर्यंत खाली येतो. त्यानंतर पिसारा फुलवून मोरासारखा थुई थुई नाचतात. संकटकाळी कुणी झडप घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्या संरक्षणार्थ चक्क २० फूट अंतरावर झेप घेत असल्याचं शेख यांनी सांगितलं.