गावच्या एकजुटीने नऊ ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:48+5:302021-01-08T05:11:48+5:30
सुरुवातीला हंजगी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक-दोघांमुळे एकमत न झाल्याने त्यांच्याविरोधात सर्व ...
सुरुवातीला हंजगी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक-दोघांमुळे एकमत न झाल्याने त्यांच्याविरोधात सर्व गाव गेले. त्यामुळे त्यांनीही शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात एकही उमेदवार राहिला नाही.
तालुक्यातील पूर्णपणे बिनविरोध झालेले ग्रामपंचायती आणि सदस्यांमध्ये उडगी: गिरीजा यळमेली, मल्लम्मा पाटोळे, इरण्णा गायकवाड, निंगम्मा कोळी, जगदेवी धानशेट्टी, वालूबाई जाधव, सुनील मोरे, लक्ष्मीबाई म्हेत्रे. आंदेवाडी (बु.): सोमण्णा कलशेट्टी, शिल्पा कुंभार, आरती कांबळे, श्रीमंत यळमेली, सिद्धप्पा यळमेली, सविता पुजारी, तेहशीन मणूरे, बसवराज दुर्ग, कलप्पा पाटील. कुमठे: चेतन पाटील, राजश्री हल्लोळी, खाजेबाई नदाफ, शारदाबाई कोटगी, रत्नव्वा पाटील, म्हाळपा शिंदे, जयश्री मैंदर्गी. नागनहळ्ळी : कमलाबाई राठोड, स्वप्नाली राठोड, शशिकला राठोड, आबिदाबी सय्यद, रमेजा शेख, बाबू मुजावर, महानंदा टेंगळे, अहमदपाशा शेख,. तोळणूर : प्रीती वालीकर, विजयालक्ष्मी हुलमनी,संजीवकुमार व्हरकेरी, श्रीदेवी मनगुळी, प्रवीण रब्बा, सिद्रामप्पा पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, इंदुमती माळी, ज्योती फुलारी, शांता हुलमनी, विरभद्रप्पा उप्पीन. मातनहळ्ळी : साहेबलाल मुजावर, ज्योती जाधव, चंद्रशा बनसोडे, रेशबी जमादार, रकमाबाई बनसोडे, मंगल राठोड, सुनील चव्हाण. हंद्राळ : मल्लिकार्जुन काटगाव, सविता गायकवाड, गंगाबाई तळवार, लक्ष्मीबाई हल्लोळी, रेवणसिद्ध तडवळ, इरण्णा पुजारी, जयश्री तुप्पद. बणजगोळ : सविता पाटील, महादेव बनसोडे, श्रीदेवी सनदी, नागाबाई व्हसुरे, रत्नमाला मुळे, बसवंत मुळे, राम मातोळे, स्वाती चव्हाण, जान्हवी कुंभार. शिरसी : राजेश राठोड, मंगल पाटील, सोजर इंगळे, लक्ष्मी इंगळे, सुनंदा व्हनशेट्टी, राचय्या स्वामी. शिरसी ग्रुप ग्रामपंचायतीचे : राचय्या स्वामी, सुनंदा व्हनशेट्टी, सोजरबाई इंगळे, लक्ष्मी इंगळे, ज्ञानेश्वर पाटील, मदन राठोड यांचा समावेश आहे.
३७ गावांतील बिनविरोध सदस्य
सांगवी बु.-१ जागा, सांगवी खु. ६, चिक्केहळळी-२, पितापूर-६, हंनूर-४, वागदरी-१, आळगे-३, गुद्देवाडी-६, देवीकवठे-२, शेगाव-८, आंदेवाडी खु-५, बबलाद-१, संगोगी आ.-१, तोरणी-४, डोंबरजवळगे-३, हालहळळी अ.-१, भुरीकवटे-२, खैराट-१, गोगाव-१, बोरोटी खु-४, बॅगेहळळी-१, कर्जाळ-२, चप्पळगाव-३, मोटयाळ-१, बासलेगाव-१, गळोरगी-१, गौडगाव खु-५, मिरजगी-१, दोड्याळ-७, कल्लहीप्परगे-१, तडवळ-१, मुंढेवाडी-२, मराठवाडी-३, किणीवाडी-१, मूगळी-१, सिंनूर-७, चिंचोळी मैं.-४ असे ३७ गावातून १०१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
फोटोओळ
तालुक्यात मोठ्या गावामध्ये गणल्या जाणाऱ्या तोळणूर गाव प्रथमच बिनविरोध झाल्यानंतर ग्रामस्थ जल्लोष करताना.