सोलापूर: बार्शी तालुक्यातील तांदूळवाडी येथे मुस्लिम समाजातील लोकांना दफनभूमी नसल्याने गावात मृत्यू झालेल्या चांद गुलाब शेख या व्यक्तीचा मृतदेह तुळजापूर-सोलापूर रोडवरील दर्शन दाराजवळ रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला आहे. शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या जीआरमध्ये प्रत्येक गावात मुस्लिम समाजासाठी एक स्मशानभूमी असावी, त्यासाठी दोन गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, असा नियम आहे.मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तांदूळवाडी या गावांमध्ये मुस्लिम समाजासाठी दफनभूमी नाही. गावातील लोक व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी शेजारच्या गावांमध्ये करीत होते ज्या दफनभूमीसाठी चांद गुलाब शेख संघर्ष करीत होते. यांचे रविवारी निधन आयुष्यभर संघर्ष करूनही गावात जागा मिळाली नाही म्हणून चिडलेल्या मुस्लिम बांधवांनी छान गुलाब शेख यांचा मृतदेह सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता.पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच सोलापूर तुळजापूर रोडवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. दुपारी दीड वाजता तुळजापूर सोलापूर रोडवरील दर्शन ढाब्याजवळ मृतदेह घेऊन येणारी ॲम्बुलन्स पोलिसांनी अडवले. मौलाना आझाद विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी येत असलेल्या अंबुलन्स रस्त्याच्या बाजूला लावून रस्त्यावर प्रशासनाचा निषेध करीत ठिय्या आंदोलन केले. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दफनभूमीसाठी जागा नसल्याने गावकऱ्यांनी मृतदेह ठेवला रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 3:30 PM