शहर उत्तरमध्ये ५.५८ तर दक्षिण मतदारसंघात ४.६१ टक्के मतदान वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:14 PM2019-04-20T12:14:49+5:302019-04-20T12:17:50+5:30
सोलापूर लोकसभा मतदान टक्का : पंढरपूरमध्ये २.१७ तर अक्कलकोटमध्ये १.९४ टक्के मतदानात वाढ
राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या मतदानात शहर उत्तर मतदारसंघात ५.५८ तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात ४.६१ टक्के मतदान मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढले आहे. पंढरपूर मतदारसंघात २.१७, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात १.९४ तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातही १.५५ टक्के मतदान वाढल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
२०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात ६२.५३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ६४.०८ टक्के इतके मतदान झाले आहे. या मतदारसंघात १.५५ टक्के मतदान वाढले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मागील निवडणुकीत ५३.२१ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात तब्बल ५८.७९ टक्के मतदान झाले आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५४.९२ टक्के मतदान झाले होेते. या निवडणुकीत या मतदारसंघात ५६.८६ टक्के मतदान झाले आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५१.८८ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत या ठिकाणी तब्बल ५६.४९ टक्के इतके मतदान झाले आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत ५७.२७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात ५९.४४ टक्के इतके मतदान झाले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ७५ हजार ४५० मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत येथील १ लाख ९३ हजार ९९० मतदारांनी मतदान केले आहे. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ४० हजार ९३० मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत येथे १ लाख ६३ हजार ९६३ मतदारांनी मतदान केले आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ७४ हजार २६६ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत येथील तब्बल १ लाख ९४ हजार ४३३ मतदारांनी मतदान केले आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ४६ हजार ११ मतदारांनी मतदान केले होते.
या निवडणुकीत येथील तब्बल १ लाख ७१ हजार ४५२ मतदारांनी मतदान केले आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत १ लाख ६४ हजार ७८४ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत या मतदारसंघात १ लाख ९६ हजार ८९१ मतदारांनी मतदान केले.
शहर मध्य मात्र स्थिर
- सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत ५५.४४ टक्के इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत मागील निवडणुकीच्या तुलनेत ०.३६ टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. मतदानाची ही कमी झालेली अल्प परिस्थिती पाहता दोन्ही निवडणुकांत या मतदारसंघातील मतदार स्थिर असल्याचे दिसून येत आहे.